मराठी बातम्या /बातम्या /देश /

Corona Virus Updates: राजधानी दिल्लीत Corona चे निर्बंध पुन्हा लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास खिशाला बसेल कात्री

Corona Virus Updates: राजधानी दिल्लीत Corona चे निर्बंध पुन्हा लागू, नियमांचं उल्लंघन केल्यास खिशाला बसेल कात्री

Corona Latest Update: दिल्लीत कोरोनाची (corona virus) वाढती प्रकरणे पाहता पुन्हा एकदा मास्क घालणे (wear a mask) अनिवार्य करण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल: दिल्लीत कोरोनाची (corona virus) वाढती प्रकरणे पाहता पुन्हा एकदा मास्क घालणे (wear a mask) अनिवार्य करण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा मास्क न घातल्यास तुम्हाला 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. बुधवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (Delhi Disaster Management) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता शाळा सध्या सुरू राहतील. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांमधील शारिरीक वर्ग सध्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, चांगल्या व्यवस्थापनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहेत. कोणत्याही ठिकाणी लोकांना एकत्र येण्यावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. मात्र सर्व प्रकारच्या सभांवर बारीक लक्ष ठेवले जाईल. पुढील 15 दिवस रूग्णांच्या रूग्णालयात दाखल होण्याच्या ट्रेंडवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. आरटी-पीसीआर चाचणीत संक्रमित आढळलेल्या सर्व नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चाचण्या घेण्याचं प्रमाण वाढवलं जाईल. लक्षणे असलेल्या सर्व लोकांची तपासणी केली जाईल. दुसरीकडे लसीकरणालाही वेग येणार आहे. इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांवर अधिक लक्ष ठेवले जाईल. मंगळवारी दिल्लीत कोरोना संसर्गाचे 632 नवीन रुग्ण आढळले. संसर्ग दर 4.42 टक्के होता. त्याच वेळी सोमवारी 501 नवीन प्रकरणे नोंदवली गेली ज्याचा संसर्ग दर 7.72 टक्के आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताहेत राजधानीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन संसर्गामध्ये वाढ झाली आहे. 11 ते 18 एप्रिल दरम्यान दिल्लीतील संसर्गाचे प्रमाण जवळपास तीन पटीने वाढले आहे. तेव्हापासून असे मानले जात होतं की, डीडीएमए बैठकीत काही कठोर निर्णय घेऊ शकते. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 632 नवीन रुग्ण आढळून आले असून, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1900 पेक्षा जास्त झाली आहे. त्याचबरोबर संसर्ग दरही चढ-उतार होत असून सोमवारी पॉझिटिव्ह दर 7.5 टक्क्यांच्या पुढे गेला होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Delhi

    पुढील बातम्या