नवी दिल्ली, 26 मार्च : देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय लष्कर (Indian Army) आणि निमलष्करी दल अत्यंत कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे आहेत. लडाख असो, सियाचीन असो वा अरुणाचल प्रदेश, सर्वत्र सैनिक 24 तास देशाच्या सीमेचं रक्षण करतात. यामध्ये भारतीय लष्कराचं पॅराट्रूपर्सही (Paratroopers) खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांना युद्धादरम्यान किंवा विशेष ऑपरेशनमध्ये पाठवलं जातं. या पॅराट्रूपर्सना कठोर प्रशिक्षण दिलं जातं. असाच एक ट्रेनिंग व्हिडिओही समोर आला आहे. याला लोकांकडून खूप पसंती दिली जात आहे. 24 आणि 25 मार्च रोजी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी कॉरिडॉरजवळ भारतीय लष्कराच्या पॅराट्रूपर्सना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. यामध्ये सुमारे 600 पॅराट्रूपर्सचा सहभाग होता. हे सर्व भारतीय लष्कराच्या एअर रॅपिड रिस्पॉन्स टीमचा भाग आहेत.
#WATCH | Around 600 paratroopers of the Indian Army's Airborne Rapid Response teams carried out large-scale drops near the Siliguri Corridor on March 24 and 25 in an Airborne Exercise: Indian Army officials pic.twitter.com/evrxSE7SGi
— ANI (@ANI) March 26, 2022
24 आणि 25 मार्चला सिलीगुडी कॉरिडॉरजवळ या सर्व पॅराट्रूपर्सना मोठ्या विमानातून खाली उडी घेण्यास सांगण्यात आलं. या सर्वांनी पॅराशूटच्या मदतीनं योग्य ठिकाणी पोहोचत जमीनीवर आपले पाय टेकले. सहसा अशी मोहीम सीमेपलीकडे चालवली जाते. जिथं शत्रूवर चटकन हल्ला करावा लागतो. हे वाचा - हजारो कोटी लुबाडणारा कुख्यात भामटा पोलिसांच्या जाळ्यात, बनला होता कांदा व्यापारी दोन दिवस भारतीय लष्करातर्फे राबविण्यात आलेल्या या सराव कार्यक्रमात सर्व पॅराट्रूपर्सना फ्री फॉल तंत्राचीही माहिती देण्यात आली. सोबतच टेहळणी, टार्गेट सराव आणि जिथे कुठे शत्रू असेल, त्याच्या अगदी पाठीमागे आकाशातून उतरून त्याचा लगेच खात्मा करायला शिकवलं. हे वाचा - योगींच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा; भाजपनं असं जुळवून आणलंय जातीचं गणित या पॅराट्रूपर्सना लष्कराकडून विविध प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. आकाशातून आवाज न करता शत्रूच्या प्रदेशात शस्त्रास्त्रांसह उतरण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. जेणेकरून ते शत्रूच्या नकळत त्याचा नाश करू शकतील. भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणात पॅराट्रूपर्स आहेत.