नवी दिल्ली, 10 मार्च : ही 2006 ची गोष्ट आहे. भगवान मान (Bhagwant Maan) स्टेजवर उभं राहून स्टँड अप कॉमेडी करीत होते आणि नवज्योत सिंग सिद्धू दुसऱ्या बाजूला बसून The Great Indian Laughter Challenge या कार्यक्रमाचं परीक्षण करीत होते. यावेळी मान यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केली. पहिलाच जोक त्यांनी राजकारणावर केला.
ते म्हणाले की, एकदा मी एका राजकीय व्यक्तीला विचारलं की, राजनिती म्हणजे काय. त्यावर तो म्हणाला की, एखाद्यावर राज वा सत्ता कशी ठेवायची याची निती तयार करीत राहणं म्हणजे राजनिती..तर त्यांनी पुढे विचारलं, की, गर्व्हरमेंट म्हणजे काय? तर दुसरी व्यक्ती म्हणाली की, जो प्रत्येक प्रश्नावर गौर करून (लक्ष देऊन) एका मिनिटानंतर विसरतो त्याला गर्व्हरमेंट म्हणतात. मान The Great Indian Laughter Challenge या सिजनचे विजेते होऊ शकले नाही. कारण नवज्योत सिंग सिद्धू यांना दुसऱ्यांचे जोक अधिक मजेशीर वाटले असतील. मात्र आता परिस्थिती पुरती बदलली आहे.
या अॅक्टला अनेक वर्षे लोटली. मान यांनी कधी विचारही केला नसेल की त्यांनी जो जोक केला होता पुढील काही वर्षात त्याचे परिमाण बदलतील. जेव्हा मान यांनी हा विनोद सादर केला तेव्हा सिद्धू पोट धरून हसू लागले होते. आता 2022 आहे. आताच हाती आलेल्या निकालानुसार, पंजाबच्या विधानसभा (Punjab Assembly Election Results) निवडणुकीत आम आदमी पक्षाने बहुमत मिळवलं आहे आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे भगवान मान पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची चिन्ह आहेत.
हे ही वाचा-राजकारण बदलतंय!मोबाइल दुकानाच्या कर्मचाऱ्याने CMला हरवलं; हे दिग्गज नेते तोंडघशी
तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांना तोंडघशी पडावं लागलं आहे. अगदी नवज्योत सिंग सिद्धू जिंकू शकलेले नाही. त्यामुळे आता पुढील पाच वर्षे ही भगवान मान यांची असणार आहे. तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, Punjab, Stand up comedy