मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO : बळीराजाच्याच पोटावर लाथ; विकासाच्या नावावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा संतापजनक प्रकार

VIDEO : बळीराजाच्याच पोटावर लाथ; विकासाच्या नावावर प्रशासकीय अधिकाऱ्याचा संतापजनक प्रकार

इतकच नाही तर प्रशासकीय कर्मचाऱ्याने 15 वर्षांच्या एका मुलीला चालत्या गाडीतून बराच वेळ घसरत नेलं आणि त्यानंतर फेकलं.

इतकच नाही तर प्रशासकीय कर्मचाऱ्याने 15 वर्षांच्या एका मुलीला चालत्या गाडीतून बराच वेळ घसरत नेलं आणि त्यानंतर फेकलं.

इतकच नाही तर प्रशासकीय कर्मचाऱ्याने 15 वर्षांच्या एका मुलीला चालत्या गाडीतून बराच वेळ घसरत नेलं आणि त्यानंतर फेकलं.

जालोर, 16 जुलै : जालोर जिल्ह्यातील सांचोर भागात एका शेतकऱ्यासोबत अधिकाराने धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Viral Video) होत आहे. येथील प्रतापपुरा गावात भारत माला प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या हायवेअंतर्गत मोबदल्यासाठी शेतकऱ्य़ांनी तेथील बांधकाम काम थांबवलं होतं. यावेळी सांचोर एसडीएमने शेतकऱ्यांना लाथ मारली. (Attack on the farmer)

इतकच नाही तर प्रशासकीय कर्मचाऱ्याने 15 वर्षांच्या एका मुलीला चालत्या गाडीतून बराच वेळ घसरत नेलं आणि त्यानंतर फेकलं. यामुळे आक्रमक शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांनी गावकऱ्यांना घटनास्थळाहून हटवलं. या प्रकरणात शेतकऱ्यांनी आज सांचोर उपखंड कार्यालयाला घेराव घातला आहे.

प्रतापपुरा गावात गुरुवारी झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये एसडीएम भूपेंद्र यादव हे नरसिंगराम चौधरी या शेतकऱ्याला लाथ मारताना दिसत आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये मुलीला चालत्या गाडीत घसरत नेलं आणि काही अंतरावर फेकून दिलं आहे. मुलगी जर गाडीच्या टायर खाली आली असती तर तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे. मात्र सुदैवाने अशी कोणतीही घटना घडली नाही. अमृतसर ते जामनगरपर्यंत तयार होणाऱ्या एक्सप्रेस 754 चं काम प्रतापपुराच्या सीमेवरुन गुरुवारी सुरू झालं होतं. मात्र गावकऱ्यांनी हे काम थांबवलं होतं. जमिनीचा योग्य तो मोबदला न मिळाल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे. (Annoying type of administrative officer in the name of development)

हे ही वाचा-ATM मधून निघणार धान्य; 5 मिनिटांत 70 किलो गहू; देशातलं पहिलं Grain ATM सुरू

काय आहे संपूर्ण प्रकरण

येथील जमिनीचा बाजारातील भाव 10 लाख रुपये बिघा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र डीएलसीने 45 हजार रुपये बिघा दिलं जात आहे. याबाबत शेतकरी 2019 मध्ये हायकोर्टात गेले होते. अद्याप याबाबत अद्याप निकाल लावण्यात आलेला नाही. कोरोनामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. यावर शेतकऱ्यांनी सांगितलं की, घर, झाडं, विहिरीसह अनेक गोष्टींचा निधी अद्याप दिलेला नाही. हा प्रकल्प बडसम ते गुजरात बॉर्डरपर्यंत 10 किमीचा आहे. दुसरीकडे निर्णय येईपर्यंत कंपनी काम रोखण्यास तयार नाही. अजूनही 90 टक्के शेतकऱ्यांना त्यांचा मोबादला मिळालेला नाही.

First published:
top videos

    Tags: Farmer, Farmer protest, Gujrat, Shocking video viral