नवी दिल्ली, 17 जुलै : शनिवारी भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनखर यांचं नाव जाहीर केलं आहे. धनखर यांनी जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचे सूत्र हाती घेतले होते. त्यावर आता विरोधी पक्षानेही आज दिल्लीत बैठका घेत उपराष्ट्रपती पदासाठी नाव जाहीर केलं आहे. काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार असणार आहेत. कर्नाटकातील मंगळुरू येथे जन्मलेल्या 80 वर्षीय अल्वा ह्या गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडचे राज्यपाल राहिले आहेत. त्यांच्या नावाची घोषणा विरोधकांच्या वतीने शरद पवार यांनी केली. भाजपला चांगली लढत देण्यासाठी विरोधकांनी विचारपूर्वक मार्गारेट अल्वा यांचं नाव जाहीर केलं आहे. कोण आहे भाजपचा उमेदवार याआधी शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यात आले होते. धनखर हे मूळचे राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी आहेत. दिल्लीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी धनखर यांच्या नावाची घोषणा केली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देऊन भाजपने एका बाणाने दोन लक्ष्य साध्य केलेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 44 टक्के ओबीसी समाजाला प्रथम राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मार्गारेट अल्वा यांची कारकीर्द राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री मार्गारेट अल्वा या राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होत्या. राजीव हे राव यांच्या सरकारमध्ये संसदीय कामकाज आणि युवा खात्याचे मंत्री होते, तर मार्गारेट सार्वजनिक आणि निवृत्ती वेतन खात्याचे मंत्री होत्या. उपराष्ट्रपती पदाला कमी समजू नका! घटनेतील ह्या तरतुदी देतात शक्तीशाली अधिकार गुजरात-राजस्थानसह 4 राज्यांच्या राज्यपाल अल्वा ह्या गुजरात, राजस्थान, गोवा आणि उत्तराखंडच्या राज्यपाल राहिल्या आहेत. अल्वा या उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत. 2009 ते 2012 या काळात त्यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय 2012-2014 पर्यंत त्या राजस्थानच्या राज्यपाल होत्या. यावेळी त्यांच्याकडे गुजरात आणि गोव्याची जबाबदारीही होती. काँग्रेस हायकमांडवर तिकीट विकल्याचा केला होता आरोप 2008 च्या विधानसभा निवडणुकीत अल्वा यांनी काँग्रेस हायकमांडवर तिकिटे विकल्याचा आरोप केला होता, त्यानंतर त्यांना काँग्रेसने सरचिटणीस पदावरून हटवले होते. अल्वा तेव्हा महाराष्ट्र, मिझोराम आणि पंजाब-हरियाणाच्या प्रभारी होत्या. मात्र, गांधी घराण्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने त्यांना उत्तराखंडला राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. दक्षिणेतील सर्वाधिक पक्षांचा पाठींबा मिळण्याची शक्यता दीर्घकाळ काँग्रेसशी संबंधित असलेल्या मार्गारेट अल्वा सद्या राजकारणात सक्रिय नाहीत. त्या राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री राहिलेल्या आहेत. अल्वा या मूळच्या कर्नाटकच्या आहेत. मार्गारेट अल्वा यांचे सासू-सासरे देखील राज्यसभेत होते. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये देखील त्यांचा समावेश होता. अल्वा यांच्या रुपात या निवडणुकीत दाक्षिणात्य महिला उमेदवार आहेत. त्या धार्मिकदृष्ट्या विचार केला तर ख्रिश्चन आहेत. पण त्यांना दक्षिणेतील सर्वाधिक पक्ष पाठींबा देण्याची शक्यता. आज 17 विरोधी पक्षाचा पाठींबा. दरम्यान, आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची भूमिका गुलदस्त्यात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.