मराठी बातम्या /बातम्या /देश /उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार कोण? शरद पवारांच्या घरी बैठक, सोनिया गांधींही फोनवर साधणार संवाद

उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार कोण? शरद पवारांच्या घरी बैठक, सोनिया गांधींही फोनवर साधणार संवाद

उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी आज दुपारी 3 वाजता विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी आज दुपारी 3 वाजता विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.

उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी आज दुपारी 3 वाजता विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.

मुंबई, 17 जुलै : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता एनडीएने उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे आता विरोधकांनीही उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार देण्यासाठी हालचाल सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली असून या बैठकीआधी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी फोनवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपराष्ट्रपतिपदाच्या ( Vice President election) विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा होणार आहे. आज दुपारी 3 वाजेच्या बैठकीपूर्वी दोन्ही नेत्यांची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधी या शरद पवार यांनीही इतर विरोधी नेत्यांशी संवाद साधणार आहे.

उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारासाठी आज दुपारी ३ वाजता विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक होणार आहे. सर्व विरोधी पक्षांना निमंत्रित करण्यात आले असून बैठकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधक उमेदवार ठरवला जाणार आहे.

एनडीएकडून जगदीप धनखर यांना उमेदवारी

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकर यांचं नाव जाहीर केलं आहे. धनखर यांनी जुलै 2019 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचे सूत्र हाती घेतले होते. गेल्या तीन वर्षांच्या काळात धनखर आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात अनेक मुद्द्यांवरुन संघर्ष बघायला मिळाला आहे. त्यांच्या या संघर्षाची दखल भाजपच्या हायकमांडने घेतली आहे. त्यामुळे ममता दीदींसोबत राजकीय पंगा घेणाऱ्या राज्यपालांची आता उपराष्ट्रपतिपदी निवड होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे धनखर यांचं उपराष्ट्रपती होणं सोपं आहे. पण लढाई वाटते तितकी देखील सोपी नाही. त्यामुळे देशाच्या उपराष्ट्रपतिपदी नेमकं कोण बसतं हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

First published:
top videos