29 जून : देशाच्या उपराष्ट्रपतीची निवडणूक येत्या 5 आॅगस्टला होणार आहे. निवडणूक आयोगानं ही घोषणा केलीय. सकाळी 10 ते 5 मध्ये ही निवडणूक होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी आहे.
#WATCH Election Commission announces schedule for Vice Presidential elections https://t.co/3PJGl2dBPu
— ANI (@ANI) June 29, 2017
जाहिरात
निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे 4 जुलैला अधिसूचना जारी होईल. आणि 18 जुलैपर्यंत नाॅमिनेशन्स फाॅर्म भरता येईल. राज्यसभा आणि लोकसभेचे निर्वाचित आणि नामांकित सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करू शकतात. 10 आॅगस्टला उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांचा कार्यकाल संपणार आहे. त्यांनी दोनदा उपराष्ट्रपती पद भुषवलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.