अहमदाबाद, 22 जुलै : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्या वक्तव्यावरून गदारोळ झाला आहे. जगदीश ठाकोर यांच्या वक्तव्याचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेने काँग्रेस कार्यालयाला हज हाऊस असल्याचे पोस्टर लावले आहेत. एवढेच नाही तर काँग्रेस कार्यालयाला हज हाऊस असे नाव द्यावे, अशी मागणी विहिंपने केली आहे. (Gujarat Congress vs Bajrang Dal)
गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी एका कार्यक्रमात देशाच्या मालमत्तेवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क असल्याचे म्हटले होते. काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनावेळी ते बोलत होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानाचाही संदर्भ दिला होता. जगदीश ठाकोर म्हणाले, मनमोहन सिंग यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे.
जगदीश ठाकोर यांनी येत्या निवडणुकीत मुस्लिमांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. तसेच मुस्लिमांसाठीही जाहीरनामा जारी करावा, अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, देशातील दंगलीमागे कोणाचा हात आहे आणि त्याचा त्यांना कसा फायदा झाला हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. आपण त्यांच्या फंदात पडणार नसल्याचे ठाकोर म्हणाले.
अहमदाबाद : आजपासून कार्यालयाचं नाव 'हज हाउस'; बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर लावले पोस्टर pic.twitter.com/rw6UeKSLJ9
— News18Lokmat (@News18lokmat) July 22, 2022
ठाकोर म्हणाले की, काँग्रेस नेहमीच अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभी आहे. सत्तेत असो किंवा नसो, आपली विचारधारा कधीही बदलणार नाही. यावेळी काँग्रेसने मुस्लिम मतदारांना एकजूट राहण्यास सांगितले, जेणेकरून त्यांची मते फुटू नयेत.
हे ही वाचा : ‘माझं काय चुकलं?’; आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात बंडखोर आमदार सांगणार शिवसेनेचे हे चुकलेले निर्णय
विहींप काँग्रेस विरोधात उतरली
जगदीश ठाकोर यांच्या वक्तव्यावर हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर हज हाऊसचे पोस्टर लावले. मात्र, पहाटे होण्यापूर्वीच हे पोस्टर्स काढण्यात आले. अहमदाबादमधील काँग्रेस कार्यालयावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले होते. आजपासून या कार्यालयाचे नाव बदलून हज हाऊस करण्यात आल्याचे पोस्टर्समध्ये लिहिले होते. काँग्रेस अध्यक्ष ठाकोर यांच्या वक्तव्यावरून हा गदारोळ झाला होता.