• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पर्यटनस्थळी मान्सूनचं रौद्ररुप; ढगफुटी झाल्यानं वाहनं गेली वाहून, घटनेचा थरारक VIDEO

पर्यटनस्थळी मान्सूनचं रौद्ररुप; ढगफुटी झाल्यानं वाहनं गेली वाहून, घटनेचा थरारक VIDEO

Cloudburst Viral Video: मागील दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे. यानंतर आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाला याठिकाणी मान्सूननं रौद्ररूप धारण केलं आहे.

 • Share this:
  धर्मशाला, 12 जुलै: सलग तीन आठवडे पावसानं दडी मारल्यानंतर उत्तर भारतात पुन्हा मान्सूननं (Monsoon) आगमन केलं आहे. मागील दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे. यानंतर आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाला याठिकाणी मान्सूननं रौद्ररूप धारण केलं आहे. ढगफुटी (cloudburst) झाल्यानं धर्मशाला येथील भागसू याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. त्यामुळे वाहनांच आणि घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पर्यटकांची चारचाकी वाहनं देखील पाण्यासोबत वाहून गेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात (Social media) वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. हिमाचल प्रदेशातील भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी हजारोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात. अशात ही ढगफुटी झाल्यानं असंख्य पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक पर्यटकांच्या महागड्या गाड्या वाहून गेल्या आहे. खरंतर ज्याठिकाणी ही ढगफुटी झाली आहे, त्याठिकाणी अरुंद नाला आहे. पण ढगफुटीच्या पाण्यामुळे हा नाला ओसंडून वाहत आहे. हेही वाचा-Raigad: काशीद बीच समोरील पूल कोसळल्याने एक कार आणि बाईक गेली वाहून, पाहा PHOTOS या नाल्याच्या दुतर्फा अनेक हॉटेल्स आहेत. त्यामुळे अनेक हॉटेलमध्ये पाणी शिरून त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण आपत्ती विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पाण्याच्या ओव्हर फ्लोमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: