जाहिरात
मराठी बातम्या / देश / नितेश राणेंचा खळबळजनक आरोप, वाझे प्रकरणात IPL आणि वरून सरदेसाईंची एण्ट्री

नितेश राणेंचा खळबळजनक आरोप, वाझे प्रकरणात IPL आणि वरून सरदेसाईंची एण्ट्री

नितेश राणेंचा खळबळजनक आरोप, वाझे प्रकरणात IPL आणि वरून सरदेसाईंची एण्ट्री

भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनीही पत्रकार परिषद घेत घणाघाती आरोप केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 मार्च : मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणावरून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात ठाकरे सरकारला कोंडीत पकडल्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनीही पत्रकार परिषद घेत घणाघाती आरोप केले आहेत. ‘वाझे प्रकरणात शिवसेनेचे युवा नेते वरून सरदसाई (Shivsena Leader Varun Sardesai) यांची भूमिका आहे. त्यामुळे वरून सरदेसाई यांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जावे,’ अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांनी या पत्रकार परिषदेत अनेक धक्कदायक आरोप केले आहेत. ‘एक साधा एपीआय इतकं मोठं पाऊल उचलतो. त्याची वकिली करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उतरतात. सामनाचे संपादक किंवा शिवसेना नेते त्यांची बाजू घेण्यासाठी पुढे येतात ते का? असा प्रश्न पडतो. त्याची काही कारण माझ्याकडे आहेत,’ असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. शिवसेना आणि आयपीएलचा 150 कोटी रुपयांचा सट्टा, काय आहे आरोप? ‘आपल्याकडे गेल्या वर्षी IPL खेळली गेली. या आयपीएलचा या केसशी काय संबंध आहे ते मी सांगणार आहे. मुंबईत अनधिकृतपणे बेटिंग करतात. या लोकांना सचिन वाझेचा फोन जातो. तुम्ही काय करता कुठे आहात हे मला माहिती आहे असं सांगितलं जातं. तुम्हाला अटक व्हायची नसेल तर मला 150 कोटी द्या अशी धमकी दिली जाते. यातील मूळ कलाकार अजून एक जण आहे. वाझेला एक फोन आला आणि आपला हिस्सा मागितला गेला. हा फोन वरून सरदेसाई यांच होता,’ असा आरोप करत नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. ‘या संभाषणाचा मागोवा NIA ने घ्यावा. सगळ्यांची तपासणी व्हावी अशी आमची मागणी आहे,’ असं नितेश राणे म्हणाले. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? सचिन वाझे प्रकरणाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर आरोप केले आहेत. ‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. माझ्याकडे जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा असं वाटलं की पोलीसच असे वागत असतील तर काय? सरकारने या प्रकरणात पाठीशी घातलं. मनसुख यांची हत्या ही गंभीर आहे. यात केवळ सचिन वाझे हे नाहीत. ही सुरुवात आहे. यात अजून कोण कोण आहे हे बाहेर आलं पाहिजे,’ अशी आक्रमक मागणी फडणवीस यांनी नुकतीच केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात