जाहिरात
मराठी बातम्या / देश / अर्थमंत्र्यांच्या लेकीचा Google वर शोध; कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वांगमई पारकाला

अर्थमंत्र्यांच्या लेकीचा Google वर शोध; कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वांगमई पारकाला

अर्थमंत्र्यांच्या लेकीचा Google वर शोध; कोण आहे निर्मला सीतारामन यांची मुलगी वांगमई पारकाला

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प (Budget 2021) सादर केला. मात्र, लोकांनी google वर निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman Daughter) नाही तर त्यांच्या मुलीलाच अधिक सर्च केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 1 फेब्रुवारी : अर्थसंकल्पाचं (Budget 2021) अनावरण होण्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी आपल्या परिवारासमवेत संसदेत आल्या. सीतारामन यांचे पती पॉलिया स्टडीजचे माजी व्यवस्थापकीय संचालक पारकाला प्रभाकर यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र, सीतारामन यांची मुलगी वांगमई पारकाला (Vangmayi Parikala Nirmala Sitharaman Daughter) हिनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. टाईम्स नाऊ ने दिलेल्या वृत्तानुसार, वांगमई पारकाला सध्या एका नॅशनल वृत्तपत्रामध्ये सिनियर रिपोर्टर म्हणून काम पाहातात. त्या प्रामुख्यानं कला, लाइफस्टाईल, टेक्नॉलॉजी आणि पुस्तकांबद्दल लिहितात. सुरूवातीच्या काळात त्यांनी भारत तसेच परदेशात अनेक वृत्तपत्रांसाठी लेखन केलं आहे. कॅमेऱ्यासमोर त्या स्वतःला कमी आणतात आणि पडद्यामागचं काम करण्याची त्यांना आवड आहे. कदाचित याच कारणामुळे त्या फारशा लोकांच्या नजरेत आलेल्या नाहीत. याचमुळे लोकांनी थेट google वरच त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

(वाचा -  BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर )

पत्रकारितेचं घेतलं आहे शिक्षण - इंग्रजी साहित्यात दिल्ली विद्यापीठातून कला आणि पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेत पत्रकारिता विषयातील मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन केली. त्यांनी मासिक आणि फोटो जर्नलिझममध्ये स्पेशलायझेशन केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

(वाचा -  Budget 2021: अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकून नितीन गडकरींना आठवले कॉलेजची स्कूटर )

वर्षाच्या सुरूवातीलाच, भारतीय हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्यासोबतचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा फोटो व्हायरल झाला होता.  यानंतर अनेकांनी असं म्हटलं, की फोटोमधील आयएएफ ऑफिसर सीतारामन यांची मुलगी आहेत. मात्र, नंतर लगेचच संरक्षण मंत्रालयाने हे दावे फेटाळले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात