मराठी बातम्या /बातम्या /देश /उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 46 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार, 46 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अतिवृष्टीमुळे (heavy rain) मोठी हानी झाली आहे.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अतिवृष्टीमुळे (heavy rain) मोठी हानी झाली आहे.

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अतिवृष्टीमुळे (heavy rain) मोठी हानी झाली आहे.

डेहराडून, 20 ऑक्टोबर: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अतिवृष्टीमुळे (heavy rain) मोठी हानी झाली आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या पावसात आतापर्यंत 46 जणांचा (46 people Death) मृत्यू झाला आहे. सोमवारपासूनची आतापर्यंत आकडेवारी जाहीर करताना, अधिकृत नोटमध्ये सांगण्यात आलं आहे की, नैनीतालसह (Nainital) अनेक भागात लोक बेपत्ता असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार, नैनिताल जिल्ह्यात जास्तीत जास्त 28 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अजूनही 11 जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे येथे मृतांचा आकडा वाढू शकतो. याशिवाय 12 लोक जखमी आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुठे आणि कधी मृत्यू झाले?

17 ऑक्टोबर

चंपावतच्या बनबसामध्ये - 1 मृत्यू

18 ऑक्टोबर

पौरी - लान्सडाउन - 3 मृत्यू, 2 जखमी

चंपावत - 2 मृत्यू

पिथोरागड - 1 मृत्यू

19 ऑक्टोबर

नैनीताल - 28 मृत्यू, 2 जखमी, 5 बेपत्ता

अल्मोडा - 6 मृत्यू, 2 जखमी,

चंपावत - 2 मृत्यू, 2 जखमी, 6 बेपत्ता

उधम सिंह नगर - 2 मृत्यू

चमोली - 4 जखमी

बागेश्वर - 1 मृत्यू

हवाई दलाची मदत पथक मदत कार्यासाठी हल्द्वानीला रवाना झालं आहे. SDRF ची टीम नैनीताल जिल्ह्यातील सालारी गावाकडे रवाना झाली असून ज्या ठिकाणी भूस्खलन झालं आहे. तिथे झालेल्या भूस्खलनात अनेक गावकरी त्यात दबले गेलेत. दुसरीकडे, रुद्रप्रयाग-केदारनाथ राष्ट्रीय महामार्ग 107 बंद आहे. डोंगरावरून दरड येत असल्यानं नौलापाणीजवळ NH बंद आहे, ते उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा- दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या अभिनेत्रीसोबत विमानात अश्लील चाळे; विकृत व्यावसायिकाला अटक

राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ चारधाम यात्रेवरच परिणाम झाला नाही तर पर्यटनावरही वाईट परिणाम झाला आहे. नैनीतालमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे पर्यटक येथे अडकलेत आणि बाकीचे परत येत आहेत. हवामानाने टिहरी तलावात बोटिंग आणि कॅम्प कॉटेज मालकांना फटका बसला आहे. पर्यटक एडवान्स बुकिंग रद्द करत असल्यानं स्थानिक व्यावसायिकांना मोठा धक्का बसत आहे. ऋषिकेशमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून भात पिकाची नासाडी झाली आहे.

अनेक राज्यांतील भागात पर्यटक अडकले

मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. नदीच्या प्रवाहामुळे अनेक भागात पूल तुटले आहेत. यामुळे स्थानिक लोक आणि पर्यटक अडकून पडले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दल तैनात करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

नैनीतालमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नैनीतालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे या पर्यटनस्थळाचा राज्याच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये सांगितलं की, ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. धामी यांनी आश्वासन दिले की, राज्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराची तीन हेलिकॉप्टर लवकरच येतील. यापैकी दोन हेलिकॉप्टर नैनीतालला पाठवण्यात येतील, जिथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मदतीची घोषणा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. उधम सिंह नगरमधील पूरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्यातील आपत्तीमध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि ज्यांची घरे तुटलेली आहेत त्यांना 1 लाख 9 हजार रुपये दिले जातील. ज्यांना जनावरांचे नुकसान झाले आहे त्यांनाही मदत केली जाईल.

हेही वाचा- गँगस्टर सुरेश पुजारीच्या फिलिपिन्समध्ये आवळल्या मुसक्या

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बाजपूर, रामनगर, किच्छा आणि सितारगंज येथील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण करून पुराचा आढावा घेतला. या वेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री धनसिंह रावत आणि राज्याचे डीजीपी अशोक कुमारही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

First published:
top videos

    Tags: Uttarakhand, Uttarakhand floods