उत्तराखंड, 19 ऑक्टोबर : उत्तराखंड (Uttarakhand)मध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. या मुसळधार पावसामुळे खूपच भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. कुठे दरड (landslide) कोसळत आहे तर कुठे भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. त्याच दरम्यान आता पूल वाहून जातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यावेळी हा पूल कोसळत होता त्याचवेळी समोरून दुचाकीस्वार सुद्धा येत होता.
उत्तराखंडच्या डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. भूस्खलनामुळे नैनीतालला जाणारे तिन्ही महामार्ग बंद झाले. यामुळे अनेक प्रवासी, पर्यटक हे रस्त्यातच, हॉटेल्समध्ये अडकले आहेत. मुसळदार पावसात गोला नदीवरील पूल अचानक तुटला. पूल तुटत असताना समोरून एक बाईकस्वार येत होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी या बाईकस्वाराला ओरडून पुन्हा जाण्यास सांगितले.
#WATCH | Uttarakhand:Locals present at a bridge over Gaula River in Haldwani shout to alert a motorcycle rider who was coming towards their side by crossing the bridge that was getting washed away due to rise in water level. Motorcycle rider turned back & returned to his own side pic.twitter.com/Ps4CB72uU9
— ANI (@ANI) October 19, 2021
स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे या बाईकस्वाराचे प्राण वाचले आहेत. जर स्थानिकांनी वेळीच बाईकस्वाराला याबाबत कळवले नसते तर मोठी दुर्घटना झाली असती. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ न्यूज एजन्सी एएनआयने ट्विट केला आहे.
केरळमध्ये महापुराचा हाहाकार; एका सेकंदात कोसळलं भलमोठं घर, VIDEO VIRAL
22 प्रवाशांची सुटका
केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलेले 22 भाविक मुसळधार पावसात अडकले होते. पावसात भाविक अडकले असल्याची माहिती एसडीआरएफ, उत्तराखंड पोलिसांना मिलाली. त्यानंतर या सर्व प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतरण करण्यात आले. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हे भाविक अडकले होते. एसडीआरएफने या सर्वच्या सर्व 22 भाविकांना सुरक्षितस्थळी हलवले.
चमोली-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद
मुसळधार उत्तराखंडमध्ये पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. या पावसामुळे चमोली-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाच्या लांबागड नाल्यात एक कार अडकली होती. ही कार जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या मुश्किलने बाहेर काढली. कारमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर प्रचंड होता आणि त्यामुळे मतदकार्यात अडचणी येत होत्या.
मुसळधार पावसामुळे नैनिताल परिसरात तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे तलावाचं पाणी आसपासच्या रस्त्यावर येऊ लागले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या या पाण्याचा वेगही प्रचंड असल्याचं दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video, Rain, Uttarakhand