प्रियकरासाठी केला उपवास, कुटुंबीयांनी पोलिसांसमोरच मुलीला केली बेदम मारहाण, पाहा Exclusive VIDEO

तरुण-तरुणी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेले असता तिथे देखील कुटुंबियांना तुफान गोंधळ घालत तरुणीला बेदम मारहाण केली.

तरुण-तरुणी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेले असता तिथे देखील कुटुंबियांना तुफान गोंधळ घालत तरुणीला बेदम मारहाण केली.

  • Share this:
    लखनऊ, 05 नोव्हेंबर : पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणारा करवाचौथ हे व्रत करण्याची परंपरा आहे. या व्रताला गालबोट लागल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीने करवाचौथ व्रत केल्यानं कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण-तरुणी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेले असता तिथे देखील कुटुंबियांना तुफान गोंधळ घालत तरुणीला बेदम मारहाण केली. ही घटना तिथे असलेल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तरुणी लिव्ह इनमध्ये एका मुलासोबत राहात होती. ही तरुणी आपल्या प्रियकरासाठी करवाचौथचं व्रत करत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली आणि त्यांनी तरुणीसह तिच्या प्रियकरालाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान या प्रकरणी न्याय मागण्यासाठी दोघंही अरविंदो पोलीस ठाण्यात पोहोचले. तिथे देखील तरुणीच्या कुटुंबियांनी तमाशा केला. हे वाचा-VIDEO : कामगार साखर झोपेत असताना रासायनिक लघु उद्योगात स्फोट ही धक्कादायक घटना लखनऊमधील अरविंदो पोलीस ठाणा हद्दीत घडली आहे. कुटुंबियांनी आपल्या मुलीसह प्रियकराला देखील पोलिसांसमोर बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीच्या भावाला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीच्या भावासह कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: