जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कामगार साखर झोपेत असताना रासायनिक लघु उद्योगात स्फोट, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

कामगार साखर झोपेत असताना रासायनिक लघु उद्योगात स्फोट, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

कामगार साखर झोपेत असताना रासायनिक लघु उद्योगात स्फोट, आगीची भीषणता दाखवणारा VIDEO

आर्कोस अद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघु उद्योग जसनोवा केमीकल मधील रियँक्टरचा जोरादार स्फोट झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायगड, 05 नोव्हेंबर : खोपोलीजवळील रासायनिक उघु उद्योगामध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे परिसरात मोठा आगडोंब उसळला होता. या आगीत 6 लघुउद्योग जळून खाक झाले आहेत. या भीषण आगीमध्ये एकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आधी स्फोट झाला आणि नंतर आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. रात्री उशिरा ही आग लागली आणि वाऱ्यासारखी वेगानं पसरत गेली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. रात्री 2.30 च्या सुमारास झालेल्या स्फोटांच्या आवाजानं 3 ते 4 किमी परिसरात दणाणून गेला. 1 किलोमीटर परिसरातील घरं, दुकानं आणि कंपन्यांच्या खिडक्या आणि दरवाज्यांच्या काचा देखील फुटल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. मात्र तोपर्यंत 6 लघु उद्योग आगीत जळून खाक झाले.

जाहिरात

हे वाचा- दिवाळीआधी लखपती बनण्याची सुवर्णसंधी! ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला श्रीमंत खोपोलीजवळच्या साजगाव येथील आर्कोस अद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघु उद्योग जसनोवा केमीकल मधील रियँक्टरचा जोरादार स्फोट झाला. या स्फोटाचं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. खोपोली नगरपरिषद, HPCL, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद, पेण नगरपरिषदेसह एकुण १० फायर ब्रिगेड टिम ने ४ तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळवलं असून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. या स्फोटात जखमी झालेल्या 4 जणांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलं आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: raigad
  • First Published :
जाहिरात
जाहिरात