मराठी बातम्या /बातम्या /देश /

Uttarakhand News: हिमकडा कोसळल्यामुळे गंगेला महापूर, 2 धरणं खाली करण्याची सूचना

Uttarakhand News: हिमकडा कोसळल्यामुळे गंगेला महापूर, 2 धरणं खाली करण्याची सूचना

 प्राथमिक माहितीनुसार, 10000 लोकांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. नदीच्या किनाऱ्यावर राहणारे गावकरी आणि धरणावर काम करणाऱ्या मजुरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 10000 लोकांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. नदीच्या किनाऱ्यावर राहणारे गावकरी आणि धरणावर काम करणाऱ्या मजुरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 10000 लोकांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. नदीच्या किनाऱ्यावर राहणारे गावकरी आणि धरणावर काम करणाऱ्या मजुरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Published by:  sachin Salve
उत्तराखंड, 07 फेब्रुवारी : देवभूमी असलेल्या उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. धौलीगंगा नदीत मोठा हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. खबरदारी म्हणून खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले आहे. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे.   हिमकडा कोसळल्यामुळे नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला आहे. या दुर्घटनेत अनेक लोकं बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. हिमकडा कोसळून धौली गंगा नदीत कोसळला आहे. त्यामुळे नदीला महापूर आला आहे. हिमकडा कोसळल्यामुळे धरणाच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नदीला महापूर आला असून गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून भागीरथी नदीचे पाणी अडवण्यात आले आहे. अलकनंदाचे पाणी थांबवण्यात यावे यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण खाली करण्यात येत आहे.  SDRF ची टीम अलर्ट आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नये, शासनाकडून वेळोवेळी सुचना देण्यात येईल, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जोशीमठजवळील  रैणी गाव  आणि आजूबाजूच्या परिसर यामुळे प्रभावित झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 10000 लोकांना महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. नदीच्या किनाऱ्यावर राहणारे गावकरी आणि धरणावर काम करणाऱ्या मजुरांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयटीबीपी उत्तराखंड पोलीस, राष्ट्रीय आपत्ता व्यवस्थापन  आणि राज्य सरकारची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. उत्तरांखडमध्ये  SDRF टीम नदी शेजारी राहणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. काही गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.  अजूनही काही ठिकाणी लोकं अडकलेली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. धौलीगंगा नदीला महापूर आला असून नंदप्रयाग, कर्णप्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग या परिसरातील हॉटेल, लॉज आणि घरं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नदीला महापूर आला आहे, पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे छोटे-मोठे बंधारे हे फुटले आहे. खबरदारी म्हणून किर्ती नगर, देवप्रयाग, मुनी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाण्याचा वेग जास्त प्रमाणात असल्यामुळे काही लोकं आणि घरं वाहून गेली आहे,अशी माहिती उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
First published:

पुढील बातम्या