नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: भारत सरकार (Government of India) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Variant) आफ्रिकामध्ये (Africa)प्रभावित देशांना आवश्यक ती मदत पुरवणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितलं की, केंद्र सरकार या ‘चिंताजनक’ व्हेरिएंटमधील प्रभावित आफ्रिकन देशांना मेड-इन-इंडिया कोरोना (Indian Corona Vaccine) लसीसह अनेक आवश्यक गोष्टी पुरवणार आहे. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा पुरवठा COVAX किंवा द्विपक्षीय पद्धतीने केला जाऊ शकतो. खरं तर, जगातील सर्व देशांना समान रितीनं कोरोना लसीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी COVAX नावाचे जागतिक व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. COVAX चे सह-नेतृत्व GAVI Vaccine Coalition, World Health Organization आणि इतर संस्थांनी केलं आहे. अनेक वैद्यकीय उपकरणांसह टेस्ट किट-व्हेंटिलेटरचा पुरवठा करणार परराष्ट्र मंत्रालयानं (Ministry of External Affairs) पुढे सांगितलं की, भारत देश गरज पडल्यास अत्यावश्यक औषधे, टेस्टिंग किट, ग्लव्ह्ज, पीपीई किट आणि व्हेंटिलेटर यांसारखी वैद्यकीय उपकरणे (Medical Equipment) पुरवण्यास तयार आहे. कारण वेळ आल्यावर त्यांना या गोष्टीची गरज भासू शकते. हेही वाचा- जगभरात झपाट्यानं पसरतोय Omicron variant, जाणून घ्या आतापर्यंत किती आढळले रुग्ण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय संस्था जीनोमिक सर्विलांस (Genomic Surveillance)आणि व्हायरस कॅरक्टराइजेशनशी संबंधित संशोधन कार्यात त्यांच्या आफ्रिकन समकक्षांशी सहकार्य करण्याचा अनुकूलपणे विचार करतील. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगभरात खळबळ माजली आहे. कोरोना व्हारसच्या Omicron या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नाव दिलं आहे. WHO च्या मते, या व्हेरिएंटला ग्रीक शब्दसंग्रहाच्या आधारे नाव देण्यात आलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या सर्व कोरोना स्ट्रेनची नावे या शब्दावलीच्या आधारे देण्यात आली आहेत. हेही वाचा- Health Care Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का? या आजारांचा धोका असू शकतो सध्या या व्हेरिएंटबद्दल जास्त माहिती नाही. दरम्यान व्हेरिएंटबाबत पुढील अभ्यास केला जात आहे. जेणेकरून हा प्रकार किती सांसर्गिक आहे आणि त्यावर लस प्रभावी आहे की नाही याबद्दल ठोस माहिती मिळू शकेल. Omicron प्रकाराच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील देश वाढत्या प्रमाणात सावधगिरीचे उपाय करत आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील देशांवर प्रवास बंदी लादण्याचाही समावेश आहे. कोरोनामुळे जगभरात 50 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत यावेळी सर्व देशांची सरकारे या नवीन व्हेरिएंटबद्दल सावध दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.