• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भाजपच्या 'या' मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा, पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतर निर्णय, नव्या नावाची उत्सुकता शिगेला

भाजपच्या 'या' मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा, पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतर निर्णय, नव्या नावाची उत्सुकता शिगेला

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिरथ सिंग हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 जुलै : राजकारण (Politics) हा अनिश्चिततांचा खेळ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत (Uttarakhand CM Tirath Singh Rawat) यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिरथ सिंग हे सध्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर असून त्यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं चाललेल्या या बैठकीनंतर तिरथ सिंग रावत यांना राजीनामा देण्याचे आदेश मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तिरथ सिंग यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार हे पुढच्या 24 ते 36 तासांत स्पष्ट होईल, अशीही माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळत आहे. डेहरादूनमध्ये शनिवारी किंवा रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होईल आणि हे आमदार आपला नवा सभागृह नेता निवडतील, असं सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. हे वाचा -  ...तरी आपण सुरक्षित नाही, धोका कायम; मोदी सरकारने राज्यांना केलं सावध बदल कशामुळे? नुकतेच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या तीरथ सिंग रावत यांना अचानक दिल्लीतून बोलावणं आल्यामुळं ते दिल्ली दरबारी दाखल झाले. त्यांनी अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे दुसरे स्थानिक नेते सतपाल महाराज आणि धन सिंग रावत यांनादेखील दिल्लीत बोलावण्यात आलं. पक्षाध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर तीरथ सिंग शनिवारी लगेच डेहरादूनला परत जाणार होते. मात्र त्यांचा परतीचा कार्यक्रमही रद्द झाला असून त्यांना दिल्लीतच थांबवण्याचे आदेश मिळाल्याची माहिती आहे. चार महिन्यांतच गच्छंती तीरथ सिंग रावत यांनी 10 मार्च रोजी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. चार महिने व्हायच्या आत त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागत आहे. पुढील वर्षी उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुका तीरथ सिंग रावतांच्या नेतृत्वाखाली व्हाव्यात, हे पक्षातील वरिष्ठांना पसंत नसल्यामुळे आतापासूनच नेतृत्वबदलाच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतं आहे. आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागते, याकडं सर्वांचं लक्ष आहे.
  Published by:desk news
  First published: