नवी दिल्ली, 02 जुलै : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची (Coronavirus in India) प्रकरणं लक्षणीयरित्या कमी झालेली आहेत. कोरोना लसीकरण (Corona vaccination in India) सुरू होऊन पाच महिने उलटले आहेत. लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे, लसीकरणाला वेगही देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी हळूहळू लॉकडाऊनचे (Corona lockdown) नियम शिथील करायला सुरुवात केली आहे. राज्यांची निर्बंध हटवण्याची तयारी सुरू असतानाच मोदी सरकारने राज्यांना अलर्ट केलं आहे. कोरोनाची प्रकरणं घटत असली तरी धोका अजून टळलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. कोरोनाची देशातील सद्यपरिस्थिती काय आहे, याबाबत केंद्र सरकार पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
Second wave of COVID-19 is not over, cannot lower guard: Govt to people
— Press Trust of India (@PTI_News) July 2, 2021
नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी सांगितलं, “कोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही. केंद्राची टीम काही राज्यांमध्ये पाठवण्यात आलेली आहे. जोपर्यंत संपूर्ण देश सुरक्षित नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही. कोरोनाविरोधातील लढा अद्यापही सुरू आहे. आपण तिसऱ्या लाटेची तयारी करत आहोत. पण तिसरी लाट येणार की नाही हे आपल्या हातात आहे”