तरुणीच्या अंगावर धडकली दुचाकी, शिपायाची भररस्त्यात चपलेनं केली धुलाई, VIDEO VIRAL

तरुणीच्या अंगावर धडकली दुचाकी, शिपायाची भररस्त्यात चपलेनं केली धुलाई, VIDEO VIRAL

या प्रकरणात शिपायाला बेदम मारहाण केल्यानं तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • Share this:

कानपूर, 11 ऑक्टोबर : दुचाकीने धक्का मारल्याच्या रागातून एका युवतीनं शिपायाची भररसस्त्यात चपलेनं मारहाण केली आहे. रस्त्यावरून जात असताना या शिपायाचा धक्का लागला आणि त्यावरून रस्त्यात वाद झाला. या तरुणीनं त्याला अद्दल घडवण्यासाठी बेदम चोप दिला. नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा पारा वाढतच होता.

चिडलेल्या मुलीनं शिपायाला चपलेनं बेदम मारहाण केली आहे. शिवाय हा शिपाई नशेत धुंद असल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप या मुलीने केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. या मुलीला शांत करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. तर काहींनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणावर नियंत्रण मिळवलं.

या प्रकरणात शिपायाला बेदम मारहाण केल्यानं तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शिपाई नशेत असल्यानं त्यानं धक्का दिल्याचा आरोप या मुलीनं केला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे भररस्त्यावर गर्दी जमली होती. अखेर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि परिस्थिती शांत झाली.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 11, 2020, 1:07 PM IST

ताज्या बातम्या