Home /News /national /

इलेक्ट्रिक बसचा Horrible अपघात; 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू, डझनभर जखमी

इलेक्ट्रिक बसचा Horrible अपघात; 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू, डझनभर जखमी

इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला आहे. काल रात्री ताटमिल चौकाजवळ एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसनं (Electric Bus Accident) 17 वाहनांना धडक दिली.

    उत्तर प्रदेश, 31 जानेवारी: कानपूरमध्ये (Kanpur News) मोठा इलेक्ट्रिक बसचा अपघात झाला आहे. काल रात्री ताटमिल चौकाजवळ एका अनियंत्रित इलेक्ट्रिक बसनं (Electric Bus Accident) 17 वाहनांना धडक दिली या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर डझनहून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींपैकी 7 जणांना ताटमिल येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि चार जणांना हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांना पायदळी तुडवून पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना ही ई बस टाटमिल चौकाजवळ एका डंपरला धडकली. मात्र, ई-बसचा चालक संधी मिळताच तेथून पसार झाला आहे. कॅनॉलमध्ये कोसळली रिक्षा,  रेस्क्यू ऑपरेशनचा LIVE VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेनं चालवण्यास सुरुवात केली आणि मध्येच जो दिसेल त्याला तुडवत निघून गेला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लाटूश रोड येथील 26 वर्षीय शुभम सोनकर, 25 वर्षीय ट्विंकल सोनकर आणि बेकनगंज येथील 24 वर्षीय अरसलान यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्य मृतांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहे. आरएम डीव्ही सिंह यांनी सांगितले की, हा अपघात ई-बस क्रमांक UP 78 GT 3970 बसचा झाला. खाजगी एजन्सी पीएमआय ई-बसच्या संचालन आणि देखभालीसाठी जबाबदार आहे. त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल. बजेट नाही म्हणून थांबू नका; घरच्या-घरी Interior साठी या 7 पद्धती वापरून मिळवा Best Look पोलीस घटनास्थळी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत असून त्यातून हा अपघात कसा घडला हे स्पष्ट होईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Road accident, Uttar pradesh news

    पुढील बातम्या