जाहिरात
मराठी बातम्या / देश / 25 व्या वर्षी आलं होतं वीरमरण; कारगिलच्या हिरोचं देश करणार स्मरण!

25 व्या वर्षी आलं होतं वीरमरण; कारगिलच्या हिरोचं देश करणार स्मरण!

जवळपास 60 दिवस चाललेल्या कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चित केलं होतं.

जवळपास 60 दिवस चाललेल्या कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चित केलं होतं.

कारगिलच्या 14 ते 18 हजार फूट उंच शिखरांवर हे युद्ध झालं होतं. तिथून भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं. त्यामुळे ‘कारगिल युद्ध’ ही भारताच्या इतिहातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे.

  • -MIN READ Local18 Gorakhpur,Uttar Pradesh
  • Last Updated :

रजत भट्ट, प्रतिनिधी गोरखपूर, 26 जुलै : जवळपास 60 दिवस चाललेल्या कारगिल युद्धात 26 जुलै 1999 रोजी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला चारी मुंड्या चित केलं होतं. त्यामुळे हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. परंतु या युद्धात भारतमातेच्या 500 हून अधिक पुत्रांना वीरमरण आलं. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आजचा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारत विरुद्ध पाकिस्तानात कारगिलच्या 14 ते 18 हजार फूट उंच शिखरांवर हे युद्ध झालं होतं. तिथून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं. त्यामुळे कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. भारताच्या विविध भागांतील जवानांनी या युद्धात आपल्या जीवाची बाजी लावली होती. यामध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूरच्या अनेक जवानांचाही समावेश होता. आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गोरखपूरच्या अवधपूरचे पुत्र शिवपूजन मिश्र यांना कारगिल युद्धात वीरमरण आलं होतं. 1999मध्ये ते मार्कंडेय कारगिलमध्ये तैनात होते. पाकिस्तानच्या घुसखोरांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं, मात्र या लढाईत ते शहीद झाले. हा दिवस आठवून गोरखपूर रहिवाशांचा उर अभिमानाने भरून येतो, परंतु शहीद जवानांच्या आठवणीत डोळे पाणावतात. सीमानं रचला होता प्लॅन B, व्हिसामुळे उघड झाली मोठी माहिती गोरखपूरकर 25 वर्षीय गौतम गुरुंग यांचं बलिदानही विसरू शकत नाहीत. कारगिल विजय दिवसाच्या काही दिवसांनंतर 5 ऑगस्ट रोजी गौतम गुरुंग शहीद झाले होते. गोरखपूरच्या कुडाघाटात आजही लोक 5 ऑगस्ट रोजी त्यांच्या आठवणीत एकत्र येतात. यावेळी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांचे वडील देहरादूनहून कुडाघाटात दाखल होतात. 1999 साली जम्मू-काश्मीरच्या तंगधार भागात देशासाठी लढताना जवान गौतम गुरुंग शहीद झाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात