बुलंदशहर, 14 नोव्हेंबर : वाढणारं प्रदूषण रोखण्यासाठी या वर्षी अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवून फटाके विकण्याचं काम सुरू होतं. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी फटाके विकणाऱ्यांना मारहाण करत ताब्यात घेतलं आहे. या घटनेदरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. फटाके विकणाऱ्या वडिलांना पोलीस घेऊन जात असल्याचं पाहून एक चिमुकली पोलिसांसमोर आली तिने हा सगळा प्रकार पाहिला माझ्या वडिलांना सोडा अशी याचना देखील केली मात्र पोलीस आपली कारवाई सुरूच ठेवत होते. हे पाहून या चिमुकलीनं पोलिसांच्या गाडीवर जोरजोरात डोक आपटून घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या चिमुकलीला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही माझ्या वडिलांना सोडा असं म्हणत ही चिमुकली गाडीवर डोकं आपटत राहिली.
हे वाचा- या देशाच्या सरकारनं भर चौकात उभारली श्वानाची 50 फूटी सोन्याची मुर्ती ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहात घडली आहे. फटाक्यांच्या बंदीनंतर बुलंदशहरच्या खुर्जा येथे फटाके विक्री करणाऱ्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीदरम्यान पोलिसांनी विक्रेत्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं वागणूक दिल्याचं पाहायला मिळालं. चिमुकली वडिलांना सोडवण्यासाठी याचना करत राहिली पण पोलिसांनी तिचं न ऐकता तिला बाजूला केलं आणि वडिलांना घेऊन गेले. घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक पोलिस कर्मचारी त्या मुलीला पोलिस जीपपासून दूर खेचताना दिसला, मुलगी रडत राहिली, वडिलांना सोडवावी अशी पोलिसांना विनवणी करत होती पण पोलिसांनी आपली कारवाई सुरू ठेवत तिला बाजूला ओढले आणि वडिलांना घेऊन गेले या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

)







