तुम्ही सर्वांनी रस्त्याच्या चौकात किंवा उद्यानातल्या नेत्यांच्या असंख्य पुतळे पाहिले असतील. मात्र रस्त्याच्या मध्यभागी कधी एखाद्या प्राण्याचा पुतळा पाहिला नसेल. मात्र तुर्कमेनिस्तान सरकारनं असंच काहीसं केलं आहे. फोटो सौजन्य : @b_nishanov
2/ 5
तुर्कमेनिस्तानची सत्ता असलेल्या गुरबंगुली बेर्दमुखमेडोव्ह यांनी आपल्या आवडत्या श्वानाचा 50 फूट उंच पुतळा उभारला असून तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात इथं मध्यभागी उभारण्यात आला आहे. फोटो सौजन्य: @b_nishanov
3/ 5
तुर्कमेनिस्तानमध्ये 2007 पासून सत्तेत असलेल्या गुरबंगुली बेर्दमुखमेडोव्ह यांनी बुधवारी या अल्बी प्रजातीच्या श्वानाच्या पुतळ्याचे अनावरण केले. ही मूर्ती खास पितळेने बनविली होती, जेणेकरून ती खराब होणार नाही. फोटो सौजन्य: @b_nishanov
4/ 5
या अल्बी श्वानाचा 50 फूट उंच पुतळा 24 कॅरेट सोन्याचं पाणी लावलेला आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. तुर्कमेनच्या अधिकाऱ्यासाठी येथे राहण्यासाठी एक नवीन क्षेत्र तयार केले गेले आहे. फोटो सौजन्य: @b_nishanov
5/ 5
अल्बी श्वान हे जगभरात पसंत केले जातात. मात्र या जातीचे श्वान मुळात तुर्कमेनिस्तानमध्येच आढळतात. हेच कारण आहे की गुरबांगुली बर्दामुखमेदोनाव्ह देखील या श्वानाला राष्ट्रीय अस्मितेशी जोडत आहेत. फोटो सौजन्य: @b_nishanov