जाहिरात
मराठी बातम्या / देश / लग्नानंतर 2 महिन्यातच प्रेयसीसाठी विवाहित प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

लग्नानंतर 2 महिन्यातच प्रेयसीसाठी विवाहित प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल

दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे, असं सर्वांना वाटायचं. अशातच बुधवारी त्याची तब्येत अचानक बिघडली आणि...

दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे, असं सर्वांना वाटायचं. अशातच बुधवारी त्याची तब्येत अचानक बिघडली आणि...

त्याचं लग्न झालंय हे माहित असूनसुद्धा त्यांच्या प्रेमाला उधाण आलं होतं. दोघांमध्ये लहान-मोठे खटके उडायचे. मात्र एके दिवशी हे भांडण त्याच्या जीवावर बेतलं.

  • -MIN READ Local18 Jhansi,Uttar Pradesh
  • Last Updated :

अश्वनी कुमार, प्रतिनिधी झाँसी, 28 जुलै : विवाहबाह्य प्रेमप्रकरणं आजकाल सर्रास पाहायला मिळतात. याच प्रेमाखातर दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाने स्वतःचा जीव गमावला. ‘जा…विष पिऊन जीव दे’, प्रेयसीचे हे शब्द ऐकताच या तरुणाने तिच्या घरासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असून त्याची नवविवाहित पत्नी विधवा झाली आहे. उत्तर प्रदेशच्या झाँसी जिल्ह्यातील चिरगाव भागात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र राजपूत नावाच्या एका व्यक्तीला शेजारी राहणारी प्रिन्सी नामक तरुणी आवडू लागली होती. दोघांमध्ये बराच काळ प्रेमसंबंध सुरू होते. नरेंद्रचं लग्न झालंय हे माहित असूनसुद्धा प्रिन्सी आणि त्याच्या प्रेमाला उधाण आलं होतं. दोघांमध्ये लहान-मोठे खटके उडायचे. मात्र एके दिवशी हे भांडण नरेंद्रच्या जीवावर बेतलं. भांडणा-भांडणात प्रिन्सीने त्याला ‘जा विष पिऊन जीव दे’, असं रागात म्हटलं. मात्र तिचे हे शब्द ऐकून पुढचा, मागचा, संसाराचा कसलाही विचार न करता नरेंद्रने टोकाचं पाऊल उचललं. आता प्रिन्सीविरोधात गुन्हा दाखल झाला असून लवकरच ती तुरुंगात असेल.

News18लोकमत
News18लोकमत

नरेंद्र आणि प्रिन्सीचं घर फार अंतरावर नव्हतं. त्यामुळे दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं नातं आहे, असं सर्वांना वाटायचं. अशातच बुधवारी नरेंद्रची तब्येत अचानक बिघडली, त्याला घरच्यांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीमा हैदरवर संशय बळावला, ‘कराची कनेक्शनचा’ तपास सुरू केवळ दोन महिन्यांपूर्वी नरेंद्रचं लग्न पूंछ भागात राहणाऱ्या हेमाशी झालं होतं. त्यामुळे लग्नाच्या दोन महिन्यांतच हेमा विधवा झाली आहे. तिच्या सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था आहे. दरम्यान, नरेंद्रच्या भावाने त्याच्या आत्महत्येला प्रिन्सीला जबाबदार धरलं. त्याने आरोप केला की, ‘माझ्या भावाने हे पाऊल उचलण्याआधी मला सांगितलं होतं, प्रिन्सी त्याला रागाच्याभरात जीव दे, असं बोलली होती. नरेंद्रचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. या प्रेमापोटीच त्याने आत्महत्या केली’, असं तो म्हणाला. नरेंद्रचे कुटुंबीय या घटनेने प्रचंड संतापले असून त्यांनी चिरगावात रस्त्यावर नरेंद्रच्या मृतदेहाभोवती आंदोलन करून वाहतूक बंद पाडली. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने आम्हाला आंदोलन करणं भाग पडलं, असं त्यांनी म्हटलं. या आंदोलनाबाबत माहिती मिळताच पोलिसांनी नरेंद्रच्या सासरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीवरून प्रिन्सीविरोधात कलम 306 अन्वये गुन्हा दाखल केला. आता याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात