पुण्यात भर रस्त्यात तिने दिली कपडे काढायची धमकी.. पोलिसांवर केली अश्लील शेरेबाजी

पुण्यात भर रस्त्यात तिने दिली कपडे काढायची धमकी.. पोलिसांवर केली अश्लील शेरेबाजी

बावधन परिसरात एका मद्यधुंद महिलेने चक्क पोलिसांना भर रस्त्यात कपडे काढायची धमकी दिली. एवढेच नाही तर तिने पोलिसांवर अश्लील शेरेबाजीही केल्याचे समोर आले आहे.

  • Share this:

वैभव सोनवणे, (प्रतिनिधी)

पुणे, 21 ऑगस्ट- बावधन परिसरात एका मद्यधुंद महिलेने चक्क पोलिसांना भर रस्त्यात कपडे काढायची धमकी दिली. एवढेच नाही तर तिने पोलिसांवर अश्लील शेरेबाजीही केल्याचे समोर आले आहे. अखेर हा सगळा प्रकार बघून पोलिसांनाच तिथून काढता पाय घ्यावा लागला. झाले असे की, बावधनच्या रामनगरमध्ये मार्व्हल सोसायटीसमोर एका विमनस्क महिलेने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत काही गाड्यांना धडक दिली. त्यानंतर महिलेने मार्व्हल सोसायटीच्या गेटजवळ पार्क केलेल्या एका कारला वारंवार ठोकर देत तिचे मोठे नुकसान केले. हा प्रकार समजल्यावर सोसायटीतल्या नागरिकांनी पोलिसांना बोलवून सगळा प्रकार सांगितला. मात्र, महिलांकडे विचारपूस करायला गेलेल्या पोलिसांनाच तिने सुनावले. महिलेने पोलिसांनाच शिवीगाळ केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे प्रकरण..?

स्वाती सौरभ मिश्रा (रा. रामनगर कॉलनी, बावधन) असे आरोपी महिलेचे नाव आहे. स्वाती तिच्या डस्टर गाडीने मंगळवारी (20 ऑगस्ट) पहाटे पावणेसहाच्या सुमारास घरी आली. सोसायटीच्या गेटजवळ एक नॅनो कार पार्क केली होती. स्वातीने सोसायटीत प्रवेश करताना नॅनोला धडक दिली. त्यानंतरही तिने नॅनो कारला जाणीवपूर्वक वारंवार धडक दिल्या. यात नॅनोचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच स्वातीने तिथे गोळा झालेल्या नागरिकांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न केला. सोसायटीतल्या नागरिकांनी पोलिसांना बोलवून सगळा प्रकार सांगितला. आरोपी महिलांकडे विचारपूस करायला गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ केली. या प्रकरणी दर्श सुभाष चावला (वय-28, रा. बावधन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या महिलेवर मानसोपचार सुरू आहेत, अशी माहिती समोर आली आहे. फौजदार आर.आर. दिवटे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

VIDEO: मुंबईत माथाडी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

Published by: Sandip Parolekar
First published: August 21, 2019, 12:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading