मराठी बातम्या /बातम्या /देश /

Lakhimpur kheri: मंत्र्याच्या वेगवान SUV नं चिरडलं शेतकऱ्यांना, लखीमपूर खेरीचा horrible Video

Lakhimpur kheri: मंत्र्याच्या वेगवान SUV नं चिरडलं शेतकऱ्यांना, लखीमपूर खेरीचा horrible Video

Lakhimpur Kheri New Horrible Video: आता या घटनेसंदर्भातला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Lakhimpur Kheri New Horrible Video: आता या घटनेसंदर्भातला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Lakhimpur Kheri New Horrible Video: आता या घटनेसंदर्भातला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

    उत्तर प्रदेश,07 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) येथे रविवारी भाजप नेते (Bjp leader) आणि शेतकरी (Farmers) यांच्यात झालेल्या हिंसाचारामुळे अजूनही तणावाचं वातावरण आहे. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत, त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर (Central Governmet) विरोधक आक्रमक झाले आहेत.आता या घटनेसंदर्भातला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ बुधवारी रात्री समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार वरून गांधी यांनी ही लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हत्तेच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अधिक धक्कादायक आहे. या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगानं येताना दिसतेय. त्यानंतर ती कार शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दरम्यान, मागून भरधाव वेगाने जाणारी कार पटकन शेतकर्‍यांवर चढते आणि पुढे जाते. त्याच्या मागे आणखी दोन गाड्या जाताना दिसतात. घटनेनंतर लगेचच लोक इकडे -तिकडे धावताना दिसत आहेत. हेही वाचा- गणपती बाप्पा मोरया, आजपासून 'श्री गणेशा'; 'सिद्धिविनायका'च्या दर्शनाची नियमावली लखीमपूर हिंसाचाराची SCने घेतली दखल, आज होणार सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी लखीमपूर खीरी घटनेची (Lakhimpur Kheri Violence) स्वतःहून दखल घेतली (SC takes Cognizance of Lakhimpur Incident) आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमाना यांचं खंडपीठ आज (गुरुवारी) या प्रकरणावर सुनावणी करणार आहे. सुनावणी सीजेआयच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाद्वारे होणार आहे. ज्यात CJI NV रमणा तसेच न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे. मंगळवारी देखील लखीमपूर खीरी प्रकरणात एफआयआर नोंदवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यासाठी गृह मंत्रालय आणि पोलिसांना निर्देश देण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मंत्र्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. काय आहे प्रकरण लखीमपूर खीरीचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या मूळ बनबीरपुर गावात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी येणार होते. याचाच विरोध शेतकरी करत होते मात्र यादरम्यानच झालेल्या दंग्यात . आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचाही समावेश होता. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, मिश्रा यांचा मुलगा ज्या एसयूव्हीमध्ये बसला होता, त्याने शेतकऱ्यांना चिरडले आणि त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा- Lakhimpur Violence : राहुल आणि प्रियांका गांधींनी घेतली मृत शेतकरी कुटुंबीयांची भेट या घटनेनंतर राजकीय वातावरणही तापलं आहे. विरोध पक्ष या घटनेसाठी भाजपला जबाबदार ठरवत आहेत.यादरम्यान बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka gandhi) सीतापुरमधून लखीमपुर खीरीसाठी रवाना झाले. लखीमपुर खीरी येथे जाण्यासाठी लखनऊ विमानतळावर पोहोचलेल्या राहुल गांधींना आपल्या वाहनाने जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. यामुळे याच्या विरोधात ते विमानतळाच्या परिसरातच धरणे आंदोलनाला बसले. यादरम्यान त्यांचा अधिकाऱ्यांसोबत वाद झाला. मात्र, काहीच वेळात प्रकरण शांत झालं आणि राहुल गांधी सीतापुरसाठी रवाना झाले. राहुल यांना आपल्या गाडीनं सीतापुर आणि लखीमपुर येथे जायचं होतं. मात्र, प्रशासनही त्यांना आपल्याच गाडीनं घेऊन जाण्यावर अडून राहिलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Uttar paredesh

    पुढील बातम्या