मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Lakhimpur Violence : राहुल आणि प्रियांका गांधींनी घेतली मृत शेतकरी कुटुंबीयांची भेट

Lakhimpur Violence : राहुल आणि प्रियांका गांधींनी घेतली मृत शेतकरी कुटुंबीयांची भेट

लखीमपूरमधील पलिया येथील मृत पावलेले शेतकरी लवप्रीत  यांच्या घरी गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र पोहोचले.

लखीमपूरमधील पलिया येथील मृत पावलेले शेतकरी लवप्रीत यांच्या घरी गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र पोहोचले.

लखीमपूरमधील पलिया येथील मृत पावलेले शेतकरी लवप्रीत यांच्या घरी गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र पोहोचले.

    लखीमपूर, 06 ॲाक्टोबर : लखीमपूर खेरी प्रकरणानंतर देशभरातील वातावरण (Lakhimpur Violence) चिघळलं आहे. दिवसभराच्या संघर्षानंतर अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचले आहे. लवप्रीत यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या गळ्यात पडून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (Rahul Gandhi and Priyanka Gandhi reached the house of the deceased farmer) लखीमपूरमधील पलिया येथील मृत पावलेले शेतकरी लवप्रीत यांच्या घरी गांधी आणि प्रियंका गांधी एकत्र पोहोचले. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी उपस्थितीत होते. यावेळी जवळपास अर्धा तास राहुल आणि प्रियांका गांधी मृत कुटुंबीयांसोबत होते. लवप्रीत कुटुंबीयांचं सांत्वन करत धीर दिला. तसंच, या लढाईमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं आश्वासनही राहुल गांधींनी दिलं. दरम्यान उत्तरप्रदेशमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की काही काळापासून भारतातील शेतकऱ्यांवर सरकारकडून हल्ले होत आहेत, शेतकऱ्यांना जीपने चिरडले जात आहे, त्यांचा खून केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, 'भाजपच्या गृहमंत्र्यांविषयी याठिकाणी बोललं जात आहे, त्यांच्या मुलाविषयी  बोललं जात आहे मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आहे. 'दुसरीकडे शेतकऱ्यांवर पद्धतशीरपणे आक्रमण होत आहे आणि त्यामुळेच शेतकरी दिल्लीबाहेर बसले आहेत. त्याची सुरुवात भूसंपादन विधेयकापासून झाली, त्यानंतर तीन कृषी कायदे मंजूर झाले. आता पद्धतशीर जे शेतकऱ्यांचं आहे ते ओरबाडून घेतलं जात आहे आणि ही चोरी सर्वांसमोर होत आहे', अशी प्रतिक्रिया यावेळी राहुल गांधी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील फटकारले. विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण ते लखीमपूर खेरीला भेट देऊ शकले नाहीत अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
    First published:

    Tags: Farmer protest, Priyaka gandhi, Rahul gandhi, Uttar pradesh

    पुढील बातम्या