Home /News /national /

हाथरस : राहुल-प्रियांका गांधींसह 200 जणांविरोधात FIR दाखल

हाथरस : राहुल-प्रियांका गांधींसह 200 जणांविरोधात FIR दाखल

कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

    नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील अत्याचार घटनेविरुद्ध देशभरात रोष व्यक्त होत आहे. दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हाथरस इथे जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या प्रकरणात आता राहुल गांधींसह 200 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ग्रेटर नोएडा इथे पोलिसांनी काँग्रेसच्या 200 नेत्यांविरोधात FIR दाखल केला. कलम 144 चं उल्लंघन केल्याप्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात कलम 188, 269, 270 अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. या आधी काँग्रेसच्या नेत्यांना हाथरस इथे पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यापासून रोखण्यात आलं होतं. हे वाचा- हाथरस: जबाब बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कुटुंबीयांवर दबाव, खळबळजनक VIDEO Viral हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले. अशावेळी मोठा जमाव येथे उपस्थित होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला. यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते आणि नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले. हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र राहुल गांधी आणि त्यांच्यासह कार्यकर्ते पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यास निघाल्यानं तिथे गोंधळ झाला आणि पोलिसांनी कलम 144चं उल्लंघन केल्याप्रकरणी 200 जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Rahul gandhi

    पुढील बातम्या