Home /News /national /

हाथरस: जबाब बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कुटुंबीयांवर दबाव, खळबळजनक VIDEO Viral

हाथरस: जबाब बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा कुटुंबीयांवर दबाव, खळबळजनक VIDEO Viral

बलात्कार करून खून केल्याचं पीडित मुलीने मृत्यूच्या आधी सांगितलं होतं. आता सरकारी अधिकारी तोच जबाब फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याने खळबळ उडाली आहे.

    नवी दिल्ली 01 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh)  हाथरस (Hathras) अत्याचार घटनेविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली आहे. देशभर वातावरण तापलेलं असताना आता सोशल मीडिया (social media) वर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. यात जिल्हाधिकारी प्रवीण कुमार हे बलात्कार पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड झालं आहे. प्रविण कुमार यांनी त्या कुटुंबाला एक प्रकारचे धकमीच दिली असून, आज मीडियाचे प्रतिनिधी तुमच्या मागे पुढे आहेत आहेत. मात्र नंतर आम्हीच असून त्यामुळे जबाब बदलायचे असतील तर आत्ताच विचार करा असंही त्यांनी पीडित कुटुंबीयांना सांगितलं आहे. बलात्कार करून खून केल्याचं पीडित मुलीने मृत्यूच्या आधी सांगितलं होतं. आता सरकारी अधिकारी तोच जबाब फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याने खळबळ उडाली आहे. आज हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांच्या भेटीसाठी जात असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले. या धक्काबुक्कीदरम्यान राहुल गांधी रस्त्यावर कोसळले. अशावेळी मोठा जमाव येथे उपस्थित होता. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठा गदारोळ झाला आहे. यावेळी यमुना एक्सप्रेस-वेवर राहुल गांधी यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्ते व नेते होते. ते हाथरस येथे पीडित कुटुंबीयांना भेटीसाठी जात असताना अडविण्यात आले. हाथरसमध्ये 144 जमावबंदी लागू केल्यामुळे पुढे जाता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. हे ही वाचा-Hathras Gang rape : राहुल गांधींना धक्काबुक्की; UP च्या पोलिसांकडून अटक यावेळी राहुल गांधींनी मी एकटा जाणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही त्यांना पुढे जाऊ दिलं नाही. तर त्यांंना धक्काबुक्की केली. यामध्ये राहुल गांधींची कॉलर पकडण्यात आली व ते खाली पडले. यादरम्यान राहुल गांधी मी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नसल्याचं सांगत होते. यावेळी सुरू असलेल्या गदारोळात 'ये देखो आज का हिंदुस्तान' असं ते समाजमाध्यमांना सांगत होते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या