फतेहपूर, 07 जून : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) फतेहपूरमध्ये (Fatehpur) पोलिसांनी एका हत्या प्रकरणाचा छडा लावत दोघांना अटक केली आहे. त्यानंतर अत्यंत गंभीर अशी माहिती समोर आली. पोलिसांच्या चौकशीत अशी माहिती समोर आली की, या दोघांनी आणि अल्पवयीन मुलाबरोबर अत्याचार केला. त्यानंतर रुमालानं गळा घोटून त्याची हत्या केली. त्यानंतर या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळला होता.
(वाचा-छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना तरुणींनी शिकवली अद्दल, भर रस्त्यातच केली धुलाई)
फतेहपूर जिल्ह्यातल्या आदमपूर गावामध्ये घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. गावातील सुनील नावाच्या व्यक्तीचा 13 वर्षीय मुलगा शिवकांतचं आरोपी गोविंद सिंह आणि मुमताज नावाच्या आरोपींनी अपहरण केलं. या अपहरणानंतर शिवकांतच्या कुटुंबीयांकडे 20 लाख रुपयांची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर गावाजवळच्या एका विहिरीमध्ये त्या मुलाचा मृतदेह आढळला होता.
(वाचा-अभिनेता मोहीत रैनाची चौघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार, पसरवत होते चुकीची माहिती)
पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर अपहरणाच्या अँगलने तपास सुरू केला होता. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांनाही याबाबत माहिती देत त्या दिशेनंही तपास सुरू केला. त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका जणाला अटक केली होती. त्यानंतर त्याची कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार स्मॅक या अंमली पदार्थाची नशा केल्यानंतर आरोपींनी पीडित मुलाना आमीष दाखवत शेतात बोलावलं होतं. त्याठिकाणी त्यांनी त्याच्यावर अत्याचार केले. त्यानंतर गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकण्यात आला.
मुलाच्या हत्येची माहिती समोर येऊ नये म्हणून, हत्येंनंतरही मुलाच्या कुटुंबीयांना फोन करून 20 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी अपहरणाचाच तपास करत राहावा, आणि पोलिसांना गुंगारा देता यावा यासाठी त्यांनी असं केलं होतं. पण पोलिसांनी योग्य तपास करत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Uttar pardesh