मराठी बातम्या /बातम्या /देश /‘निवार’नंतर आठवडाभरातच तामिळनाडूत दुसरं चक्रीवादळ धडकणार, मुसळधार पावसाची शक्यता    

‘निवार’नंतर आठवडाभरातच तामिळनाडूत दुसरं चक्रीवादळ धडकणार, मुसळधार पावसाची शक्यता    

 4 डिसेंबरला कन्याकुमारीच्या किनाऱ्याजवळून हे चक्रीवादळ जाणार आहे. यापूर्वीच्या बंगालच्या उपसागरातून आलेल्या भयंकर निवार चक्रीवादळानं (Cyclone Nivar ) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये हाहाकार माजवला होता.

चेन्नई 1 डिसेंबर: ‘निवार’च्या तडाख्यानंतर तामिळनाडूला (Tamil Nadu)  दुसऱ्या चक्रीवादळाचा (Cyclone) फटका फसण्याची शक्यता आहे. 4 डिसेंबरला हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याचा अंदाज असल्याचं IMD (India Meteorological Department)ने म्हटलं आहे. आठवडाभरात राज्यात येणारं हे दुसरं वादळ आहे. बंगालच्या खाडीमध्ये उच्च दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

IMDच्या अलर्ट नुसार श्रीलंकेतल्या त्रिंकोमाली जवळून हे वादळ येणार आहे. ताशी 75 ते 85 किमी वेगाने वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल असं म्हटलं जात आहे. या आधी आलेल्या वादळाचा मोठा फटका तामिळनाडूला बसला होता. त्यामुळे तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्ष्यद्वीप, आंध्र प्रदेशात पाऊस होण्याची शक्यता आहे.  4 डिसेंबरला कन्याकुमारीच्या किनाऱ्याजवळून हे चक्रीवादळ जाणार आहे.

यापूर्वीच्या बंगालच्या उपसागरातून आलेल्या भयंकर निवार चक्रीवादळानं (Cyclone Nivar ) तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये हाहाकार माजवला होता. या वादळामुळे बरीच झाडं पडली, अनेक भिंती पडल्या, पण एक चांगली बातमी अशी आहे की याच जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

हवामान खात्याने ही माहिती दिली. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनीही सांगितले की, केंद्रशासित प्रदेशात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेली नाही. त्याचवेळी सुमारे दोन हजार लोकांना मदत शिबिरात हलविण्यात आलं होतं.

First published:
top videos

    Tags: Cyclone