मराठी बातम्या /बातम्या /देश /दलाई लामांचा चीनला धक्का, 8 वर्षीय मुलावर सोपवली बौद्ध धर्माची महत्त्वाची जबाबदारी

दलाई लामांचा चीनला धक्का, 8 वर्षीय मुलावर सोपवली बौद्ध धर्माची महत्त्वाची जबाबदारी

dalai lama

dalai lama

दलाई लामा यांनी अमेरिकन मंगोलियन मुलाला तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक नेता म्हणून घोषित केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

ल्हासा, 25 मार्च : बौद्ध धर्माचे नेते दलाई लामा यांनी अमेरिकन मंगोलियन मुलाला तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वात महत्त्वाचा अध्यात्मिक नेता म्हणून घोषित केलं आहे. द टाइम्सच्या रिपोर्टनुसार, यावेळी जवळपास ६०० मंगोलियन त्यांच्या नव्या अध्यात्मिक नेत्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये दिसतं की, ८७ वर्षीय दलाई लामांना एक मुलगा लाल कपडे आणि मास्क घालून भेटत आहे.

मंगोलियन मुलाचं वय ८ वर्षे असल्याचं सांगितलं जातंय. रिपोर्टनुसार, जुळ्या मुलांपैकी एक असलेल्या या मुलाला दलाई लामा यांनी १०वे खलखा जेटसन धम्पा रिनपोछे यांचा पुनर्जन्म असल्याचं म्हटलं आहे. बौद्ध धर्मगुरुंच्या पुनर्जन्माला विशेष महत्त्व दिलं जातं. धर्मगुरुच्या पुनर्जन्माचा सोहळा हिमाचल प्रदेशात आय़ोजित केला होता. तिथे ६०० मंगोलियन त्यांच्या नव्या अध्यात्मिक नेत्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. तिथेच दलाई लामासुद्धा राहतात. दरम्यान, या सोहळ्यामुळे मंगोलियाचे शेजारी असलेल्या चीनचा संताप होण्याची शक्यता आहे.

जिनिव्हात PhD करतेय स्वच्छता कर्मचाऱ्याची मुलगी, UNHRCमध्ये म्हणाली, भारताच्या संविधानाने दलितांना दिले अधिकार

दलाई लामा यांनी २०१६ मध्ये मंगोलियाचा दौरा केला होता तेव्हा चीनने त्यांच्यावर टीका केली होती. चीन सरकारने म्हटलं होतं की, या दौऱ्यामुळे चीन-मंगोलिया संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला. तर दलाई लामा यांनी म्हटलं की, तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरे सर्वात महत्त्वाचे लामा जेटसन धाम्पाचा मंगोलियात पुनर्जन्म झाला होता. त्यांना अनेक दिवसांपासून शोधण्याचा प्रयत्न सुरू होता.

First published:
top videos

    Tags: America, China