• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • राज्यासाठी तातडीने निधी द्या, महाविकास आघाडीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

राज्यासाठी तातडीने निधी द्या, महाविकास आघाडीच्या खासदारांची अर्थमंत्र्यांकडे मागणी

राज्यासाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी पुन्हा एकदा खासदारांनी रेटून धरली आहे. 

  • Share this:
  नवी दिल्ली, २ ऑगस्ट : महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र (Maharashtra flood) तसेच कोकणाला पुराच्या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे,अशात या भागांच्या पुनर्वसनासाठी ३ हजार कोटींचा निधी केंद्राने द्यावा, या मागणीचा पुनरोच्चार शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी(ncp) कॉंग्रेस (congress)खासदारांच्या शिष्ठमंडळाने केला. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याशी यासंबंधी चर्चा केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 29 जुलै रोजी केंद्र सरकारला पत्र लिहले होते. यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठी मदत देण्याचे आवाहन केले होते. पुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे अगोदरच नागरिक हवालदील झाले आहेत. अशातच विमा कंपन्यांकडून त्यांची करण्यात येणारी छळवणूक थांबवावी अशी आग्रही मागणी यावेळी शिष्ठमंडळाकडून करण्यात आली.राज्यासाठी केंद्राने तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी पुन्हा एकदा खासदारांनी रेटून धरली आहे.  पुरामुळे वाहन आणि दुकानांचे बरेच नुकसान झाले. पंरतु, विमा कंपन्यांकडून यासंबंधीचा परतावा देण्यात बरीच टाळाटाळ केली जात आहे. अनेकांच्या वाहनांची कागदपत्रे पुरात वाहून गेली आहेत. केंद्राने पुरग्रस्तांसाठी विम्यासंबंधीचे नियम बदलावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्याकडून मागण्यात आलेल्या मदतीसंबंधी केंद्रीय पथक पाठवून आढावा घेण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. राज्याला एनडीआरएफचा अतिरिक्त निधी मिळावा, याकरिता शिष्ठमंडळाकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली आहे. शिष्ठमंडळात शिवसेनेचे संसदीय पक्ष नेते संजय राऊत लोकसभेतले गटनेते विनायक राऊत माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, प्रियंका चर्तुवेदी, कृपाल तुमाने यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे, फौजिया खाना, सुनील तटकरे तसेच इतर खासदार उपस्थित होते. संसद भवनातील केंद्रीय अर्थमंत्र्याच्या कार्यालयात ही भेट झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र शिष्टमंडळाच्या वतीने ताज्या घडामोडीबाबत देखील एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या वतीने लिहण्यात आले आहे. 
Published by:sachin Salve
First published: