मराठी बातम्या /बातम्या /देश /

शरद पवारांच्या घरी तातडीची बैठक; वरिष्ठ नेत्यांसह संजय राऊतही पोहोचले

शरद पवारांच्या घरी तातडीची बैठक; वरिष्ठ नेत्यांसह संजय राऊतही पोहोचले

विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 17 जुलै : भाजपने उपराष्ट्रपदीपदाच्या (Vice Presidential Election) उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. उपराष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून शनिवारी सायंकाळी उशिरा जगदीप धनखड यांना उमेदवारी घोषित केली आहे. यानंतर आता विरोधी पक्ष नेत्यांनीही तातडीने बैठक बोलावली आहे.

शरद पवार यांच्या घरी बैठक बोलवण्यात आली आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल. विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन होणार असून या बैठकीत अधिवेशनाबाबतही चर्चा होणार आहे. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊत थोड्याच वेळात शरद पवारांच्या घरी दाखल झाले आहे. याशिवाय समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव देखील पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.

शिवसेना पक्षाने राष्ट्रपती निवडणुकीसाठी नुकतीच आपली भूमिका जाहीर केली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (India Presidential Election 2022) आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. यानंतर 21 जुलै रोजी देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा केली जाईल. सर्वांच्या नजरा दोन प्रमुख उमेदवारांवर खिळल्या आहेत. एकीकडे एनडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या बाजूने खासदार व आमदार करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. सध्यातरी द्रौपदी मुर्मू यांना कागदावर मोठा पाठींबा दिसत आहे.

First published:

Tags: Sanjay raut, Vice president, Vice president voting, शरद पवार. sharad pawar