जाहिरात
मराठी बातम्या / देश / कसं शक्य आहे? भारतातील या गावात अनेक जमिनींचे मालक आहे पाकिस्तानी नागरिक

कसं शक्य आहे? भारतातील या गावात अनेक जमिनींचे मालक आहे पाकिस्तानी नागरिक

कसं शक्य आहे? भारतातील या गावात अनेक जमिनींचे मालक आहे पाकिस्तानी नागरिक

भारतातले अनेक नागरिक त्यांचं सर्वस्व इथेच ठेवून पाकिस्तानात गेले. स्वातंत्र्याच्या वेळी देश सोडून पाकिस्तानात गेलेल्या अनेक नागरिकांची जमीन अजूनही भारतात असल्याची बाब समोर आली आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 30 एप्रिल: भारत आणि पाकिस्तानचे संबंध (India Pakistan Relation) कायम तणावपूर्ण राहिले आहेत. भारतापासून पाकिस्तान वेगळा होऊन आता 75 वर्षं झाली आहेत; पण तणावपूर्ण संबंध अद्यापही सुधारलेले नाहीत. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधून काही नागरिक घरं-दारं सोडून भारतात आले. भारतातले अनेक नागरिक त्यांचं सर्वस्व इथेच ठेवून पाकिस्तानात गेले. स्वातंत्र्याच्या वेळी देश सोडून पाकिस्तानात गेलेल्या अनेक नागरिकांची जमीन अजूनही भारतात असल्याची बाब समोर आली आहे. इतकंच नाही, तर इथल्या जमिनीच्या नोंदींमध्ये पाकिस्तानी व्यक्तींची नावंही नोंदवली जातात. त्याचप्रमाणे देशाचं नावही पाकिस्तान असं लिहिलं जातं, असं दिसून आलं आहे. अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर प्रदेशमधलं आहे. कानपूर देहात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अकबरपूर तहसीलमधल्या बारा गावांत जमिनी नोंदींमध्ये पाकिस्तानमधल्या नागरिकांची नावं आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता तहसील प्रशासन पाकिस्तानी नागरिकांच्या नावावर नोंदवलेल्या जमिनींचा तपशील तयार करत आहे. यानंतर या प्रकरणात शत्रू मालमत्तेअंतर्गत कारवाई केली जाईल. हे वाचा- रिअल लाइफ ‘दसवी’! शाळा सोडली पण जिद्द नाही; वयाच्या 58 व्या वर्षी दहावीची परीक्षा देतायेत आमदार स्वातंत्र्यानंतर देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर काही भारतीय नागरिक तिथे राहायला गेले. त्यांच्या जमिनी आजही येथे आहेत. या जमिनी अनेक वर्षं ओसाड पडून राहिल्या; मात्र लोकसंख्या (Population) वाढल्याने जागा कमी पडू लागल्यानंतर काही नागरिकांनी त्यावर कब्जा करण्यास सुरुवात केली, अशी माहिती झी न्यूजने दिली आहे. दरम्यान, ज्यांच्या नावावर या जमिनी आहेत त्या व्यक्ती जिवंत आहेत की नाही, याचीही माहिती उपलब्ध नाही. शिवाय आतापर्यंत या जमिनीच्या प्रकरणात कोणाविरोधातही तक्रार करण्यात आलेली नाही.

    जाहिरात

    कानपूर जिल्हा दंडाधिकारी नेहा जैन यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्या म्हणाल्या, की अशा प्रकरणाची कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. परंतु ही बातमी समोर आल्यानंतर अशा जमिनींची पाहणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. या जमिनींची तपासणी केल्यानंतर त्याची माहिती शासन स्तरावर दिली जाणार आहे. त्यानंतर या जमिनींसंदर्भात शत्रू मालमत्ता नियमानुसार कारवाई केली जाईल, असं नेहा जैन यांनी सांगितलं. हे वाचा- भारत-पाकिस्तानवर मोठं संकट येण्याची भीती, स्कॉटलंडच्या वैज्ञानिकांचा मोठा इशारा दरम्यान, फाळणीला 75 वर्षं होऊन गेल्यानंतरही पाकिस्तानमधल्या नागरिकांच्या नावे भारतात जमिनी आढळल्या आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन याच्या नोंदी ठेवत असूनही हे प्रकरण आतापर्यंत समोर का आलं नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. परंतु जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात आता स्वतः लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या जमिनींचं पुढे काय होईल, हे शासन निर्णयानुसार ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात