जाहिरात
मराठी बातम्या / देश / UP Election Result 2022: यूपीत भाजपची सत्ता, पण 60 जागेवर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेचं काय झालं?

UP Election Result 2022: यूपीत भाजपची सत्ता, पण 60 जागेवर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेचं काय झालं?

UP Election Result 2022: यूपीत भाजपची सत्ता, पण 60 जागेवर निवडणूक लढणाऱ्या शिवसेनेचं  काय झालं?

UP Election Result 2022: निवडणूक जाहीर होताच भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं यूपीत मोर्चेबांधणी सुरु केली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उत्तर प्रदेश,10 मार्च: उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) भाजपला मात देण्यासाठी शिवसेना (Shivsena) ही निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मात्र अद्याप उत्तर प्रदेशमध्ये आपलं खातं खोलता आलं नाही. निवडणूक जाहीर होताच भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेनं यूपीत मोर्चेबांधणी सुरु केली होती. सकाळी 10 वाजेपर्यंत शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान झाल्याचं दिसून आलं आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेनं स्वतंत्रपणे उमेदवारी उभे केले होते. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना 0.02 टक्के मते मिळाली. तर नोटा पर्यायाला 0.71 टक्के मतं मिळाली. निवडणुकीचं (UP Election 2022) बिगूल वाजलं तेव्हा शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी युपीत (UP) 60 जागांवर उमेदवार उभे करु आणि त्या 60 जागांवर शंभर टक्के जिंकूनच येऊ, असा निर्धार केला होता. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते, महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) स्वत: युपीत प्रचारासाठी गेले होते. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी हा दौरा केला होता. पहिल्यांदाच उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे कुटुंबीयांतील आदित्य ठाकरे उत्तर प्रदेशात दाखल झाले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबरोबर आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये प्रचारसभा घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी थेट भाजपवरही निशाणा साधला आहे. शिवसेनेची या निवडणुकीतही डिपॉझिट जप्त होणार? उत्तर प्रदेशातील निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर सांगायचं झाल्यास तर पक्षाकडून ताकद लावण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचं दिसलं. पक्षातील दिग्गज नेत्यांच्या रॅली युपीत झाल्या. पण सोशल मीडियावर गाजावाजा करण्यात शिवसेना काहिशी कमी पडल्याचा अंदाज आहे. कारण शिवसेनेच्या युपीच्या अधिकृत ट्विटर वॉलवर शिवसेनेच्या नेमक्या किती उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात अर्ज दाखल केलाय याबाबतची सविस्तर माहिती देखील शेअर करण्यात आलेली नव्हती. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून 60 उमेदवार उभे करण्यात आले होते. पण निवडणूक आयोगाने 19 जणांची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे 41 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण एक्झिट पोलच्या आकडेवारी यापैकी कुणालाही यश येईल, याची शक्यता खूप कमी असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात