पुढील पाच वर्षांत सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय 5000 कोटी रुपये खर्चाची मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना सुरू करण्याचे सांगण्यात आले आहे. या योजने अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना बोअरवेल, कूपनलिका, तलाव, टाक्या इत्यादी बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे. वाचा : Aurangabad: शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर जमा झाले 15 लाख अन् बांधलं स्वप्नातलं घर आणि मग... यासोबतच 25,000 कोटी रुपयांची सरदार वल्लभभाई पटेल कृषी-पायाभूत सुविधा अभियान योजना सुरू कऱण्याचंही म्हटलं आहे. या अंतर्गत राज्यभरात ग्रेडिंग यूनिट, कोल्ड चेन चेंबर्स, प्रोसेसिंग यूनिट तयार करण्यात येणार आहे.लोक सेवा आयोग (UPPSC) सहित सभी सरकारी नौकरियों में महिलाओं की संख्या दोगुनी करेंगे।
कॉलेज जाने वाली मेघवी छात्राओं को रानी लक्ष्मी बाई योजना के अंतर्गत मुफ्त स्कूटी वितरित करेंगे। 60 वर्ष से अधिक उम्र की महिलाओं के लिए सार्वजनिक परिवहन में मुफ्त यात्रा प्रदान करेंगे। pic.twitter.com/yw1V2MKYpS — BJP (@BJP4India) February 8, 2022
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट आणि एमएसपीवर विशेष भर अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी संदर्भात विशेष घोषणा करणअयात आली आहे. पुढील 5 वर्षांत एमएसपीवर गहू आणि धान्याच्या खरेदीत आणखी सुधारणा करण्यात येईल असं जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 14 दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. या मुदतीत पेमेंट न केल्यास कारखान्यांकडून व्याजसह रक्कम वसूल करण्यात येईल असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे. इतकेच नाही तर सरकार सत्तेवर आल्यास 5000 कोटी रुपये खर्चून ऊस गिरणी नूतनीकरण अभियान राबवण्यात येईल असंही आश्वासन भाजपने दिलं आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना के सभी लाभार्थियों को प्रति वर्ष होली और दीपावली को 2 मुफ्त एलपीजी सिलेंडर प्रदान करेंगे।
सभी आंगनबाड़ी कार्यकर्ताओं एवं स्वास्थ्य सखियों को आयुष्मान भारत के अंतर्गत स्वास्थ्य बीमा प्रदान करेंगे।#भाजपा_का_संकल्प pic.twitter.com/eA4AFDOgid — BJP (@BJP4India) February 8, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, BJP, UP Election, विधानसभा निवडणूक