Home /News /national /

योगी आदित्यनाथ सरकारला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

योगी आदित्यनाथ सरकारला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू

कॅबिनेट मंत्री कमला राणी वरूण यांची 18 जुलैला कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

    लखनऊ, 02 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला मोठा चटका लावणारी बातमी समोर आली आहे. कॅबिनेट मंत्री कमल राणी वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 18 जुलै रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर कमल राणी वरूण यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कमल राणी वरूण यांच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लखनऊमधील PGI रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. रविवारी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांसह इतरांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 2017 रोजी कानपूरच्या घाटमपूर सीटवरून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. ही जागा भाजपकडून जिंकवून आणणाऱ्या त्या पहिल्या आमदार होत्या. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये त्या कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहात होत्या. कमल राणी वरून यांचा कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा प्रवास - जन्म- 3 मे 1958 लखनऊ - कमल राणी वरून यांचा विवाह LIC अधिकारी किशन लाल वरूण यांच्यासोबत झाला होता. - त्यांनी समाजशास्त्र या विषयात MAची पदवी घेतली होती. - 1989 पहिल्यांदा कमल राणी यांना द्वारकापुरी प्रभागातून कानपूर नगरसेवकपदाचं तिकटी देण्यात आलं. - कमल राणी यांनी त्यावेळी ही जागा जिंकूण भाजपचा झेंडा महानगरपालिकेत रोवला. - 1995 मध्ये त्याच प्रभागातून पुन्हा नगरसेवकपदी निवडून आल्या. - 1996 मध्ये भाजपाने त्यांना घाटमपूर (आरक्षित) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. अनपेक्षितरित्या जिंकल्यानंतर - लोकसभेवर पोहोचलेल्या कमल राणी यांनीही 1998 मध्ये याच जागेवरुन पुन्हा विजय मिळविला. - 1999 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा बसपाचे उमेदवार प्यारेलाल संखवार यांचा केवळ 585 मतांच्या फरकाने पराभव केला. - खासदार असताना कमल राणी यांनी कामगार व कल्याण, उद्योग, महिला सशक्तीकरण, राज्यभाषा आणि पर्यटन मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीमध्ये राहून काम केलं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Uttar pradesh, Uttar pradesh news, Yogi adityanath

    पुढील बातम्या