Home /News /national /

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 31 जानेवारीला Virtual रॅली, 11 जिल्ह्यातल्या दीड लाख कार्यकर्त्यांना करणार संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 31 जानेवारीला Virtual रॅली, 11 जिल्ह्यातल्या दीड लाख कार्यकर्त्यांना करणार संबोधित

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election Campaign) प्रचार जोरात सुरू आहे.

    लखनऊ, 29 जानेवारी: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election Campaign) प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) संसर्गामुळे राज्यात आरोग्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या काळात किमान गर्दी जमवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) 31 जानेवारी रोजी व्हर्च्युअल रॅलीमध्ये भाग घेणार आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील (Assembly constituency) मतदारांशी संवाद साधणार आहेत. तसेच पक्षाला मत का द्यायचे, यावर देखील बोलणार आहेत. पीएम मोदींची ही व्हर्च्युअल रॅली (Virtual Rally) अनेक अर्थांनी खास असणार आहे. या दरम्यान पंतप्रधान मोदी 11 जिल्ह्यांतील 58 जागांच्या जवळपास 1.5 लाख कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. याअंतर्गत ते एक लाख बूथ अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. किंबहुना विधानसभा निवडणुकीच्या काळात बूथ अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच पंतप्रधान त्यांच्याशी थेट संवाद साधून निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करणार आहेत. Heel Pain Home Remedies: थंडीत टाचांचं दुखणं जास्तच बळावतं; या 5 गोष्टींनी घरीच करू शकाल इलाज यापूर्वी पीएम मोदींनी वाराणसीतील बूथ अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. यावेळी मोदी म्हणाले होते की, प्रत्येक मत खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी लोकांना जागरूक करणे खूप गरजेचे आहे. याशिवाय पक्षाने केलेल्या विकासकामांवरही त्यांनी चर्चा केली. याशिवाय केंद्राने सुरू केलेल्या विविध योजनांबाबतही मोदींनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सध्या राज्यात निवडणुकीच्या संदर्भात चांगलेच वातावरण तापलेलं आहे. अशा स्थितीत मोदींची व्हर्च्युअल रॅली पक्षासाठी अनेक अर्थांनी खास ठरू शकते. यासोबतच बूथ अध्यक्ष आणि विभाग प्रमुखांनाही पुढे काम करण्याची प्रेरणा मिळेल. विशेष म्हणजे यूपीमधील निवडणुकीचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारीपासून राज्याच्या पश्चिम भागातून सुरू होत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Narendra modi, Pm modi

    पुढील बातम्या