नवी दिल्ली, 28 जून: उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (UP Assembly Election 2021) पडघम आता वाजू लागले आहेत. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजपाकडे 8 ते 10 जागांची मागणी केली आहे. आठवलेंनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेऊन आगामी पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांवर चर्चा केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) घटकपक्ष या नात्यानं आठवलेंनी या राज्यांमध्ये विधानसभा जागांची मागणी भाजपाकडे केली आहे. त्यांनी सर्वात जास्त 8 ते 10 जागा उत्तर प्रदेशात मागितल्या आहेत. तर उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर राज्यात 2 ते 3 जांगाची मागणी केली आहे. भाजपाचा होणार फायदा! उत्तर प्रदेशात दलित मतदारांची संख्या मोठी आहे. हे मतदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आधार आहेत. त्यांचा पक्ष भाजपासोबत लढला तर माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्ष मायावतींना फटका बसू शकतो. मायावतींची देखील दलित ही व्होटबँक आहे. मायवतींचे मतं कमी झाल्यास त्याचा थेट फायदा भाजपाला होईल, असा आठवलेंचा दावा आहे. रामदास आठवले यांनी यावेळी अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकांवरही जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. एनडीएच्या बळकटीसाठी त्याचा विस्तार होणे आवश्यक आहे. त्यासाठी छोट्या पक्षांना आघाडीमध्ये सहभागी करुन घेणे आवश्यक असल्याचं आठवले यांनी सांगितले. या मागणीवर विचार करण्याचं आश्वासन नड्डा यांनी दिलं असल्याचं आठवलेंनी यावेळी साांगितले. पाकिस्तानी तरुणीचं जडलं भारतीयावर प्रेम; देशात प्रवेश मिळवण्यासाठी थेट मोदींना केली विनंती उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, आणि गोवा या राज्यांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका आहेत. यापैकी उत्तर प्रदेश हे भाजपासाठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मतदारसंघ वाराणसी हा उत्तर प्रदेशातच आहे. मागील विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशनं भाजपाला दणदणीत बहुमत दिले होते. आता पुढील वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या राजकीय भवितव्यासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.