मराठी बातम्या /बातम्या /देश /'शकूनी', 'बहरी सरकार' ते 'तानाशाह', 'असंसदीय शब्दां'ची मोठी यादी जाहीर

'शकूनी', 'बहरी सरकार' ते 'तानाशाह', 'असंसदीय शब्दां'ची मोठी यादी जाहीर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना चर्चा करताना वापरता न येणाऱ्या शब्दांची यादी (unparliamentary) जाहीर करण्यात आली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना चर्चा करताना वापरता न येणाऱ्या शब्दांची यादी (unparliamentary) जाहीर करण्यात आली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना चर्चा करताना वापरता न येणाऱ्या शब्दांची यादी (unparliamentary) जाहीर करण्यात आली आहे.

    मुंबई, 14 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे (Monsoon Session) वेध लागले आहे. या अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना चर्चा करताना वापरता न येणाऱ्या शब्दांची यादी (Words banned in Parliament) जाहीर करण्यात आली आहे.   संसदेत बोलली जाणारी भाषा काय असावी याची एक व्याख्या आहे त्याला अनुसरून काही असंसदीय शब्द संसदेच्या सभागृहांत तसंच राज्यांतील विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदनांत वापरण्यास बंदी घातली जाते. चुकून शब्द उच्चारला गेला तर तो रेकॉर्डवर नोंदवला जात नाही. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा सचिवालयाने अशा शब्दांची यादी तयार केली आहे. राज्यसभा आणि लोकसभेत हे शब्द वापरण्यास मनाई असेल.

    या यादीमध्ये बोलताना मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांचा समावेश आहे. खासदार रोज या शब्दांचा वापर करत असतील तरी त्यांना संसदेत हे शब्द वापरता येणार नाही. संसदेत अशा शब्दांचा वापर असंसदीय (unparliamentary words) मानला जाईल.

    काय आहे निर्णय?

    असंसदीय शब्दांची माहिती देणारी पुस्तिका 18 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये 'anarchist', 'dictatorial', 'शकूनी', 'तानाशाह', 'तानाशाही', 'जयचंद', ‘विनाश पुरुष', 'खलिस्तानी', 'खून से खेती', 'दोहरा चरित्र', 'निकम्मा', 'नौटंकी', 'ढिंढोरा पीटना' आणि 'बेहरी सरकार' असे शब्द वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसंच संसदेच्या कामकाजात वादविवादाच्या वेळी असे शब्द वापरल्यास ते रेकॉर्डमधून काढून टाकले जातील, अशी सूचना देण्यात आली आहे.

    'मंत्रिपद द्याच' 12 बसेस अन् गाड्या घेऊन सेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ निघाले मुंबईला, VIDEO

    देशातील विविध विधी मंडळांमध्ये तसेच संसदेमध्ये अध्यक्षांकडून काही शब्द आणि वाक्प्रचार असंसदीय असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भविष्यातील संदर्भासाठी लोकसभेच्या सचिवालयाने असे असंसदीय शब्द एकत्रित करून त्याची यादी तयार केली आहे. दरम्यान, यापैकी कोणते शब्द कामाकाजाच्या रेकॉर्डमध्ये ठेवायचे आणि कोणते काढायचे, याबद्दलचा शेवटचा निर्णय हा राज्यसभा अध्यक्ष आणि लोकसभा अध्यक्ष घेतील.

    भारतीय संसदेची लोकसभा आणि राज्यसभा ही सभागृहं तसंच देशातील विधानसभा आणि विधान परिषदेची सभागृह यांच्या कामकाजादरम्यान 2021मध्ये जे शब्द आणि वाक्प्रचार किंवा संकल्पना असंसदीय जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यांचा या नव्या यादीत समावेश केलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रकुल देशांच्या संसदेंतही जे शब्द असंसदीय म्हणून उल्लेखले गेले आहेत, त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. यात असंही लक्षात आलं आहे की, काही विशिष्ट शब्द हे इतर शब्दप्रयोगांसोबत वापरले तरच ते असंसदीय म्हटले जाऊ शकतात, अशा शब्दांचाही या यादीत समावेश आहे.

    हिंदी असंसदीय शब्दांमध्ये 'anarchist', 'गद्दार', 'गिरगिट', 'गुंडे', 'घडियाली आँसू', 'अपमान', 'असत्य', 'अहंकार', 'भ्रष्ट', 'काला दिन', 'कालाबाजारी' आणि 'खरीद फरोख्त' या शब्दांचा समावेश आहे. तसंच 'दंगा', 'दलाल', 'दादागिरी', 'दोहरा चरित्र', 'बेचारा', 'चमचा', 'चमचागिरी', 'चेले', 'विश्वासघात', 'संवेदनहीन', 'मूर्ख', 'पिठ्ठू', 'बेहरी सरकार' आणि ‘sexual harassment' शब्द हे असंसदीय मानले जातील आणि रेकॉर्डमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

     इंग्रजी शब्दांची यादी

    इंग्रजी असंसदीय शब्दांमध्ये ‘bloodshed’, ‘bloody’, ‘betrayed’, ‘ashamed’, ‘abused’, ‘cheated, ‘bob cut’, ‘lollypop’, ‘childishness’, ‘corrupt’, ‘coward’, ‘criminal’ आणि ‘crocodile tears’ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘disgrace’, ‘donkey’, ‘drama’, ‘eyewash’, ‘fudge’, ‘hooliganism’, ‘hypocrisy’, ‘incompetent’, ‘mislead’, ‘lie’ आणि ‘untrue’ हे शब्द वापरण्यासही मनाई असेल.

    मोदी सरकारवर लक्ष्य

    असंसदीय शब्दांच्या यादीवरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहे. या यादीत ‘संघी’ शब्दाचा समावेश करण्यात आलेला नाही, असं म्हणत टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच “भाजपा सरकार देशाचा कसा विनाश करतंय, हे सांगण्यासाठी विरोधकांकडून वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे,” असंही मोईत्रा म्हणाल्या.

    First published:

    Tags: Loksabha, Parliament, Parliament session, Rajyasabha