मराठी बातम्या /बातम्या /देश /Unmanned Aircraft : संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

Unmanned Aircraft : संरक्षण क्षेत्रात भारताला मोठं यश, डीआरडीओने केली मानवरहित विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

बुधवारी, स्वदेशी विकसित हाय स्पीड एक्स्टेंडेड टार्गेट मानवरहित विमान 'अभ्यास'ची ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी साइटवरून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.

बुधवारी, स्वदेशी विकसित हाय स्पीड एक्स्टेंडेड टार्गेट मानवरहित विमान 'अभ्यास'ची ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी साइटवरून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.

बुधवारी, स्वदेशी विकसित हाय स्पीड एक्स्टेंडेड टार्गेट मानवरहित विमान 'अभ्यास'ची ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी साइटवरून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली.

बंगळुरू, 1 जुलै : भारताने संरक्षण क्षेत्रात (Indian Defence Sector) मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओद्वारा (DRDO) विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचे (Unmanned Aircraft) पहिले उड्डाण परिक्षण करण्यात आले. हे परिक्षण शुक्रवारी कर्नाटकाच्या चित्रदुर्गमध्ये झाले. या कामगिरीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या. या कामगिरीला ते मोठी उपलब्धि आहे, असे म्हणाले. यासंबधी ट्विट करत त्यांनी भारतीय सैन्याचे मनोबलही वाढवले.

इतर वस्तूंचेही निर्माण भारतातच - 

DRDOच्या अंतर्गत बंगळुरू येथील रिसर्च लॅब एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅबलिशमेंटने याचे डिजायनिंग करुन याला तयार केले आहे. या विमानाच्या तयारीसाठी वापरण्यात आलेले एयरफ्रेम, एवियोनिक सिस्टिम आणि अन्य वस्तूंचे निर्माण भारतातच करण्यात आले आहे.

याआधी बुधवारी, स्वदेशी विकसित हाय स्पीड एक्स्टेंडेड टार्गेट मानवरहित विमान 'अभ्यास'ची ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी साइटवरून यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. मात्र, या विमानाने कमी उंचीवर उड्डाण केले. आईटीआरद्वारे तैनात केलेल्या रडार इलेक्ट्रो ऑप्टिकल टारगेटिंग प्रणालीसह विविध साधनांद्वारे चाचणीचे परीक्षण केले गेले.

हेही वाचा - IBPS Clerk 2022: IBPS परीक्षा पास करा तुमची बँकेत नोकरी फिक्स; देशातील 'या' बँकांमध्ये मिळतात जॉब्स

संरक्षण मंत्री काय म्हणाले -

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सरावाच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओ आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आणि सांगितले की या प्रणालीच्या विकासामुळे हवाई लक्ष्यांची आवश्यकता पूर्ण करण्यात मदत होईल. तसेच यामुळे गुंतागुंतीच्या लष्करी व्यवस्थेत आत्मनिर्भर भारताचा मार्ग मोकळा होईल.

डीआरडीओच्या संस्थेत अभ्यास विमानाचे डिजाइन तयार -

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने 'अभ्यास'ची रचना केली आहे. तसेच त्याला विकसित केले आहे. हे विमान पूर्णपणे स्वयंचलित उड्डाणासाठी तयार केलेले आहे.

First published:

Tags: Banglore, Rajnath singh