Home /News /career /

IBPS Clerk 2022: IBPS परीक्षा पास करा तुमची बँकेत नोकरी फिक्स; देशातील 'या' बँकांमध्ये मिळतात जॉब्स

IBPS Clerk 2022: IBPS परीक्षा पास करा तुमची बँकेत नोकरी फिक्स; देशातील 'या' बँकांमध्ये मिळतात जॉब्स

IBPS जॉब्स २०२२

IBPS जॉब्स २०२२

IBPS ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू शकतो? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया.

    मुंबई, 01 जुलै: देशात असे अनेक तरुण तरुणी आहेत जे बँकमध्ये जॉब (How to get job in Bank) करण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. तसंच असेही काही विद्यार्थी असतात ज्यांना बारावीनंतर शिक्षण घेण्यासोबतच बँकेत जॉब मिळवण्यासाठी परीक्षांची तयारी करत असतात. या सर्व बँकांच्या परीक्षा IBPS म्हणजे इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल या संस्थेद्वारे घेण्यात येतात. मात्र हे IBPS आहे तरी काय? (What is IBPS?) ही परीक्षा दिल्यानंतर नक्की कोणत्या बँकांमध्ये जॉब मिळू शकतो? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया. यंदा देशातील काही प्रमुख बँकांसाठी भरतीची IBPS नं घोषणा (IBPS Clerk Recruitment 2022) केली आहे. त्यानुसार आता तब्बल सहा हजार पदांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेची अधिसूचना (IBPS Clerk Recruitment 2022 Notification) आज 1 जुलै 2022 रोजी जारी करण्यात आली आहे. उमेदवारांना www.ibps.in वर अर्ज करावा लागेल. त्याअंतर्गत लिपिकाची 6035 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दरवर्षी लाखो उमेदवार IBPS परीक्षेला (IBPS Clerk Recruitment exam 2022) बसतात. देशातील तरुणांमध्ये बँकेतील नोकऱ्यांची प्रचंड क्रेझ आहे. तुम्ही यासाठी IBPS लिपिक अधिसूचना 2022 तपासून अर्ज करू शकता. तसेच, तुम्हाला IBPS परीक्षा आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येक तपशील माहित असणं आवश्यक आहे. सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांनो आजच अर्ज करा; IBPS तर्फे साडेसहा हजार पदभरती IBPS म्हणजे काय? IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection. IBPS ही अशीच एक संस्था आहे, जी बँकेतील नोकरीसाठी परीक्षा घेते.. या संस्थेद्वारे भारतातील 11 सरकारी बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. मात्र यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा सामील होत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची परीक्षा वेगळी घेण्यात येते. IBPS Clerk साठी पात्रता काय? लिपिक पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेतले पदवीधर (Any Graduate) उमेदवार या रिक्त पदावर अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 वर्षांपेक्षा जास्त आणि 28 वर्षांपेक्षा कमी असावं. तसंच आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. Vastu tips : घरबसल्या येतील ड्रीम जॉब्सच्या ऑफर; नोकरीसाठी करा हे सोपे उपाय कोणत्या बँकांमध्ये मिळते नोकरी बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक बँक ऑफ महाराष्ट्र
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या