Home /News /national /

मुलगा शहीद झाल्याच्या वृत्ताने कुटुंबावर शोककळा, मात्र दुसऱ्याच दिवशी जवानाचा आला फोन

मुलगा शहीद झाल्याच्या वृत्ताने कुटुंबावर शोककळा, मात्र दुसऱ्याच दिवशी जवानाचा आला फोन

चीन सीमेवरच्या वादात सुनील कुमार शहीद झाला अशी माहिती आली होती. त्यानंतर त्याची पत्नी आणि सगळ्या कुटुंबानेच हंबरडा फोडला होता. सगळं गाव सांत्वनासाठी जमा झालं होतं.

    पाटना 17 जून: भारत-चीन सीमेवर झालेल्या धुमश्चक्रित बिहारचा जवान सुनील कुमार हा शहीद झाल्याचं वृत्त मंगळवारी आलं होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबांवर शोककळा पसरली होती. जवानाच्या आई, पत्नी आणि इतर सदस्यांनी हंबरडा फोडला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या जवानाचा फोन आला आणि अख्ख कुटुंब आनंदात बुडून गेलं. केवळ नाव सारखं असल्याने ही गफलत झाल्याचं नंतर लक्षात आलं. चीन सीमेवरच्या वादात सुनील कुमार शहीद झाला अशी माहिती आली होती. त्यानंतर त्याची पत्नी आणि सगळ्या कुटुंबानेच हंबरडा फोडला होता. सगळं गाव सांत्वनासाठी जमा झालं होतं. नंतर दुसऱ्याच दिवशी सुनीलचा त्याच्या पत्नीला फोन आला. मी सुखरूप असून काळजीचं कारण नाही असं त्याने पत्नीला सांगितलं आणि कुटुंबातलं वातावरणच बदलून गेलं, अशी माहिती सुनीलची पत्नी मेनकाने दिलीय. जी माहिती बाहेर आली होती ती चुकीची होती. एकाच नावाचे दोन सैनिक होते. त्यामुळे ही गडबड झाल्याचं पुढे आलं आहे. दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. पंतप्रधान काय म्हणाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन सोबत सुरू असलेल्या वादावर आपली प्रतिक्रीया व्यक्त केलीय. जवानांचे बलिदां.न व्यर्थ जाणार नाही असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू करण्यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आणि पंतप्रधानांसह सर्वच नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. भारताची कुणी खोड काढली तर भारत योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे. कुणीही शंका बाळगू नये असा इशाराही त्यांनी दिला. हेही वाचा -  भारत-चीन सीमेवरील संघर्ष: भारताचे 80 जवान जखमी; चीनच्या 65 जवानांचा मृत्यू CSK संघातील 'या' व्यक्तीनं शहीद जवानांचा केला अपमान
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Indian army

    पुढील बातम्या