वाराणसी, 26 एप्रिल: कोरोना साथीच्या रोगानं मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवले आहेत. जगात कोरोना विषाणूची उत्त्पती झाल्यापासून सर्व चाली-रिती आणि परंपरा गळून पडल्या आहेत. घराबाहेर पडल्यानंतर मास्क घालका लागेल, आपल्याचं लोकांपासून दूर राहावं लागेल, याचा कोणीही विचार देखील केला नसेल. पण एका कोरोनाने जगाचं संपूर्ण चित्रचं बदलून टाकलं आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला आहे. लग्न परंपराही ( marriage in Corona period) यापासून वंचित राहू शकली नाही. कोरोना काळातील बदलत्या नैसर्गिक नियमांचं पालन करणारा एक अनोखा विवाहसोहळा नुकताचं पार पडला आहे. या लग्नात कोरोना विषाणूचं संक्रमण रोखण्यासाठी सर्व संभाव्य प्रयत्न करण्यात आले होते.
उत्तर प्रदेशातील काशी याठिकाणी हा अनोखा विवाहसोहळा पार पडला असून, लग्नात आलेल्या वऱ्हाडींचं स्वागत कोल्ड्रींक्सऐवजी काढ्यानं (guest welcomed with decoction instead of cold drinks) केलं आहे. एवढंच नव्हे, तर लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी मास्कही भेट (gift mask to guest) म्हणून दिला आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच पालन करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी दोन लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून डान्स केला आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
कोरोना संसर्गामुळे घेतला निर्णय
लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचं काढ्यानं स्वागत करणारे हरत लाल चौरसिया यांनी सांगितलं की, कोरोना संसर्ग लक्षात घेता कोल्ड्रींक्सच्या जागी काढा ठेवण्यात आला होता. तसंच कोणत्याही पाहुण्याला कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हरत लाल चौरसिया यांनी पुढं सांगितलं की, गेल्या वर्षी आपल्या मुलाचं लग्न ठरवण्यात आलं होतं. पण देशातील लॉकडाऊनमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे आता कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला आहे.
(वाचा-तुम्हाला हवी ती Corona vaccine घेता येईल का? सरकारने काय सांगितलं पाहा)
दुसरीकडे, लग्नात आलेल्या पाहुण्यांना देखील लग्नाची ही नवीन पद्धत फारच आवडली आहे. मास्क परिधान करून डीजेसमोर डान्स करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींचं काढा देऊन स्वागत केल्यानं अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage, Uttar pradesh, Varanasi, World After Corona