लखेश्वर यादव (जांजगीर चांपा),05 एप्रिल : छत्तीसगडमधील जंजगीर चंपा जिल्ह्यात एक अनोखा विवाह पाहायला मिळाला. येथे पाच तृतीयपंथी आपल्या गुरूशी लग्न केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान त्या पाच तृतीयपंथीयांनी लग्न केल्यानंतर आपण आनंदी झालो असल्यीच प्रतिक्रीया दिली आहे.
दरम्यान हा तब्बल तीन दिवस या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पहिल्या दिवशी कुलदेवता बहुचरा मातेची पूजा दुसऱ्या दिवशी मातेसमोर हळद खेळण्याचा सोहळा तर तिसऱ्या दिवशी राज्यभरातील तृतीयपंथीय एकत्र येत कलश यात्रा काढली.
बहुचरा मातेचे पूजन केल्यानंतर माही, ज्योती, राणी, काजल, सौम्या या पाच तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा पार पडला. यामध्ये त्या तृतीयपंथीयांच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेतला आणि सर्वांना हळद आणि तेल लावून स्नान घातलं. यानंतर या पाच तृतियपंथीयांचा विवाह सोहळा त्यांचे मानले जाणारे गुरू शारदा नायक यांच्याशी पार पडला.
या तृतीय पंथियांपैकी एकीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तीच्यामुळे बऱ्याच तृतीयपंथीयांना तिने आदर्श उभा केला आहे. ती म्हणाले की, आम्ही देखील एक व्यक्ती आहोत आम्हालाही आमचे जीवन जगण्याचा अधिकार आहे. स्त्री-पुरुषांचा विवाह समुहाने होतो असाच आमचाही विवाह सोहळा पार पडल्याचे तिने सांगितलं.
अंडं शाकाहारी की मांसाहारी? याचं उत्तर तुम्हाला आश्चर्यचकीत करु शकतंतृतीयपंथीयांचे नातेवाईकही या लग्नात सहभागी झाले होते. हे पाहून आनंदाबरोबरच दुःखही होत असल्याचे त्यांनी सांगितलं. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात देवीची पूजा, हळदीचा विधी, नृत्य व मेजवानी, कलश यात्रा असा कार्यक्रम असल्याचे सांगितलं.