मराठी बातम्या /बातम्या /देश /

What an Idea! या दुकानात गरजूंना 1 रुपयांत मिळतात stylish कपडे

What an Idea! या दुकानात गरजूंना 1 रुपयांत मिळतात stylish कपडे

गरीबांना त्यांच्या आवडीचे कपडे हवे (Unique idea of bank which sells cloth bank for 1 rupee) तेव्हा खरेदी करता यावेत, यासाठी एक अऩोखं दुकान सुरू करण्यात आलं आहे.

  • Published by:  desk news

गरीबांना त्यांच्या आवडीचे कपडे हवे (Unique idea of bank which sells cloth bank for 1 rupee) तेव्हा खरेदी करता यावेत, यासाठी एक अऩोखं दुकान सुरू करण्यात आलं आहे. या दुकानात कुठलीही वस्तू (Any item in 1 rupee) हे फक्त एका रुपयात विकत मिळते. श्रीमंतांना त्यांना हवे असलेले कपडे कुठल्याही वेळी आणि कितीही किंमत मोजून विकत घेता येतात. मात्र गरीबांसाठी अंगावर कपडे असणं, ही बाबच मोठी असते. अशा गरीबांना त्यांच्या आवडीचे कपडे वापरता यावेत, यासाठी (Idea by four friends) चार मित्रांनी एकत्र येत ही अनोखी कल्पना साकारली आहे.

अशी आहे कल्पना

बंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटी परिसरात हे दुकान सुरु करण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी मंगळुरूमध्ये शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांच्या कपड्याविषयी काहीतरी करण्याची कल्पना सुचली. गरीबांना चांगले कपडे घालता यावेत आणि आत्मसन्मानानं राहता यावं, यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यातूनच त्यांनी एक एनजीओ सुरू केली. या एनजीओमार्फत हे दुकान सुरू करण्यात आलं असून कुठलीही गरीब व्यक्ती या ठिकाणी येऊन केवळ एका रुपयात वस्तू विकत घेऊ शकते.

एक रुपया कशासाठी?

गरीबांचा आत्मसन्मान कायम राहावा आणि आपण काही फुकट घेतलंय, अशी भावना त्यांच्यात निर्माण होऊ नये, यासाठीच एक रुपया घेण्याची कल्पना निश्चित करण्यात आली. इथं शर्ट, ट्राऊझर, टॉवेल आणि कुठलीही गोष्ट केवळ एका रुपयांत विकत घेणं शक्य होतं.

हे वाचा-पुण्याच्या या शास्त्रज्ञ बाईंचा Google ने doodle च्या रूपाने केला मानाचा मुजरा

कल्पनेचं कौतुक

2013 साली इमॅजिन ट्रस्ट नावानं चार मित्रांनी ही संस्था सुरू केली. त्यानंतर मेलिशा नावाची एक तरुणी या संस्थेत सहभागी झाली. तिने पुढाकार घेतल्यामुळे संस्थेच्या कामाचा आवाका वाढला आणि मोठ्या प्रकल्पांना हात घालायला सुरुवात केली. त्यांना मिळणाऱ्या देणग्यांमधून ते उत्तम प्रतिचे कपडे विकत घेतात आणि केवळ एका रुपयात गरीबांना उपलब्ध करून देतात. या कल्पनेचं बंगळुरूसह देशभरात कौतुक होत आहे.

First published:

Tags: Bengaluru, Shopping