नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : नवं सिमकार्ड घेण्यासाठीच्या नियमांमध्ये केंद्र (
New rules to buy sim card) सरकारने बदल केला असून काही नियम अधिक कडक केले आहेत. सिमकार्ड घेणं नागरिकांना सोपं व्हावं, मात्र बोगस सिमकार्डचा सुळसुळाट थांबावा, या दोन्ही गोष्टी लक्षात (S
trict rules for sim card) घेऊन नवे नियम तयार कऱण्यात आले आहेत.
व्यवहार होणार डिजिटल
यापुढे एखादा नंबर प्रिपेडवरून पोस्टपेड करायचा असेल किंवा पोस्टपेडवरून प्रिपेड करायचा असेल, तरी कागदी फॉर्म भरण्याची गरज नसेल. एक डिजिटल फॉर्म भरून ग्राहक हे काम जलद करू शकणार आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम विभागानंही केवायसीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
कागदपत्रांची गरज नाही
नव्या नियमांनुसार जर एखाद्या नागरिकाला नवं सिमकार्ड विकत घ्यायचं असेल, तर आता कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रत्येक नागरिकाचा डिजिटल केवायसी हाच त्यासाठी गृहित धरला जाणार आहे. प्रत्येक टेलिकॉम कंपनीच्या ऍपवर यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर जाऊन ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी नागरिकांना केवळ 1 रुपया शुल्क भरावे लागेल. वेबसाईटवरून किंवा मोबाईल ऍपवरून ग्राहक हे काम पूर्ण करू शकतात.
डिजिटल केवायसीसाठीच्या पाच पायऱ्या
- सिम प्रोव्हरचे ऍप डाऊनलोड करा
- स्वतःचा वापरात असणारा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा नंबर द्या
- त्यावर ओटीपी पाठवला जाईल
- त्यानंतर सेल्फ केवायसीचा पर्याय निवडा. इतर माहिती भरून डिजिटल फॉर्म सबमिट करा.
हे वाचा -
विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी
अल्पवयीनांना सिमकार्ड नाही
नव्या नियमानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण नसणाऱ्या व्यक्तींना सिमकार्ड देण्यात येणार नाही. एखाद्या व्यक्तीची मनोवस्थी ठिक नसेल, तरीदेखील त्या व्यक्तीला कार्ड मिळणार नसल्याचा नियम करण्यात आला आहे. अल्पवयीन व्यक्तीला किंवा मनोरुग्णाला सिमकार्ड विकलं, तर ते विकणाऱ्या कंपनीला दोषी धरण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. नव्या नियमानुसार कुठलीही व्यक्ती स्वतःच्या नावे जास्तीत जास्त 12 सिमकार्ड खरेदी करू शकेल, असंही नव्या नियमांत नमूद करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.