नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : केंद्रीय मंत्रिमंडळानं (Union Cabinet) आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला (Atmanirbhar swastha bharat scheme) मंजुरी (Approval) दिली आहे. एकूण 64 हजार कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये पायाभूत आरोग्य सुविधा आणि औषधं यांचा पुरवठा केला जाणार आहे. 3382 ब्लॉकमध्ये एकीकृत जन स्वास्थ्य लॅबची स्थापनाही या योजनेअंतर्गत केली जाणार आहे. काय आहे योजना? यापूर्वीच केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनची घोषणा केली आहे. मात्र ही योजना पूर्णतः वेगळी असून त्याचा राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनशी काहीही संबंध नसल्याची माहिती आहे. या योजनेची घोषणा 2021-22 सालच्या वार्षिक अर्थसंकल्पात करण्यात आली होती. पुढच्या सहा वर्षांसाठी ही योजना असणार आहे. 64,180 कोटी रुपयांचीही योजना असणार असून टप्प्याटप्प्यानं ही तरतूद केली जाणार आहे. ग्रामीण भागाला होणार फायदा देशातील ग्रामीण भागात पायाभूत सुविधा पोहोचवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. देशातील ग्रामीण आरोग्य केंद्रांना पायाभूत सुविधा पुरवणे, नव्या आरोग्य केंद्रांची उभारणी करणे, गंभीर आजारांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल्सची उभारणी कऱणे अशा अनेक गोष्टी या योजनेअंतर्गत केल्या जाणार आहेत. हे वाचा - पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, सांगितलं धक्कादायक कारण ही कामे होणार
- 10 राज्यांमध्ये 17,788 आरोग्य केंद्रांना मिळणार मदत
- सर्व राज्यांमध्ये 11,024 नव्या आरोग्य केंद्रांची उभारणी
- सर्व जिल्ह्यांमध्ये एकीकृत सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची उभारणी
- 602 जिल्हे आणि 12 केंद्रीय संस्थांमध्ये क्रिटीकल केअर हॉस्पिटल ब्लॉकची स्थापना
- राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांची उभारणी आणि सक्षमीकरण
- सर्व सार्वजनिक प्रयोगशाळांना जोडण्यासाठी एकात्मिक पोर्टलची स्थापना
- 15 इमर्जन्सी ऑपरेशन केंद्रं आणि 2 मोबाईल इस्पितळांची उभारणी